अमेरिकेतील हिंदू मंदिराची खलिस्तानी समर्थकांनी केली तोडफोड! कठोर कारवाईची मागणी
23-Dec-2023
Total Views |
नवी दिल्ली : अमेरिकेत पुन्हा एकदा एका हिंदू मंदिराला लक्ष्य करण्यात आले आहे. खलिस्तानी समर्थकांनी कॅलिफोर्नियातील नेवार्क हिंदू मंदिरावर हल्ला केला आणि त्याच्या भिंतीवर भारतविरोधी घोषणाही लिहिल्या आहेत. या कृत्यानंतर भारताने तीव्र आक्षेप व्यक्त करत कठोर कारवाईची मागणी केली आहे.
अमेरिकेत खलिस्तानी समर्थकांकडून मंदिरावर झालेल्या हल्ल्याच्या घटनेवर जयशंकर म्हणाले की, "खलिस्तानी शक्तींना भारताबाहेर जागा मिळू नये. आमच्या दूतावासाने तेथील सरकार आणि पोलिसांकडे तक्रार केली असून तपास सुरू आहे. सॅन फ्रान्सिस्कोमधील भारतीय दूतावासाने या प्रकरणाची त्वरित चौकशी आणि तोडफोड करणाऱ्या दोषींवर त्वरित कारवाई करण्यासाठी अमेरिकन अधिकाऱ्यांना निर्देश दिले आहेत."
केवळ अमेरिकाच नाही तर ऑस्ट्रेलिया आणि कॅनडामध्येही हिंदू मंदिरांना अनेकदा लक्ष्य करण्यात आले आहे. त्याचबरोबर ऑस्ट्रेलियातही अशीच घटना अनेकदा घडली आहे. दोन महिन्यांपूर्वी खलिस्तानींनी श्री लक्ष्मी नारायण मंदिरावर हल्ला केला होता. या घटनेत मंदिरांच्या भिंतीचे नुकसान झाले होते.