सुशांत सिंगच्या आठवणींत अंकिता लोखंडे पुन्हा झाली भावूक…

    09-Nov-2023
Total Views | 60

sushant singh rajput 
 
मुंबई : अभिनेता सुशांत सिंग राजपूत याचा मृत्यू प्रत्येकाला मनाला चटका लावून गेली. आजही सुशांतचे चाहते, कुटुंबीय त्याच्या आठवणींत भावूक होतातच. नुकताच सुरु झालेल्या हिंदी 'बिग बॉस १७' मध्ये अभिनेत्री अंकिता लोखंडे स्पर्धक म्हणून गेली आहे. यावेळी सहस्पर्धकांशी गप्पा मारताना सुशांत सिंगच्या आठवणीत अंकिता भावूक झालेली दिसून आली.
 
 
 
अंकिता लोखंडे म्हणाली, “सुशांत खूप शांत होता. तो खूप मेहनती होता. तो थोडासाही वर-खाली झाला तर त्याला काळजी वाटायची. समाज माध्यमावर त्याच्याबद्दल कोणी काहीही बोललं तरी त्याचा ते विचार करायचा. कारण खुप कमी वयात आणि काळात त्याला हे यश मिळाले होते”, असे डोळ्यांच्या कडा पाणावत अंकिता म्हणाली.
अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121