पंतप्रधानांनी 'त्या' मुलीला दिलेले वचन केले पुर्ण! पत्र पाठवत केले चित्राचे कौतूक

    04-Nov-2023
Total Views | 50

Modi's letter


रायपूर :
पंतप्रधान नरेंद्र मोदींचे चित्र काढणाऱ्या आकांक्षाचे कौतूक करण्यासाठी त्यांनी तिला पत्र लिहिले आहे. कांकेरमधील सभेत आकांक्षाला दिलेले वचन त्यांनी पुर्ण केले आहे. तसेच तिला पत्र लिहून त्यांनी तिचे आभार मानले आहे.
 
२ नोव्हेंबर रोजी छत्तीसगडमधील कांकेर येथे पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या रॅलीमध्ये आकांक्षा ठाकूर नामक चिमुकलीने त्यांचे चित्र काढून आणले होते. याकडे पंतप्रधान मोदींचे लक्ष जाताच त्यांनी आकांक्षाला चित्रामागे तिचा पत्ता लिहिण्यास सांगितले होते. तसेच तिला पत्र पाठवण्याचे वचन दिले होते. ते वचन पुर्ण करत त्यांनी आता तिला पत्र लिहिले आहे.

 
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आकांक्षा ठाकूरला लिहिलेल्या पत्रात म्हटले की, "प्रिय आकांक्षा, शुभेच्छा आणि आशीर्वाद. कांकेर कार्यक्रमात तू माझ्यासाठी आणलेले रेखाटन माझ्यापर्यंत पोहोचले आहे. या प्रेमळ अभिव्यक्तीसाठी खूप खूप आभार. भारतातील मुली या देशाचे उज्ज्वल भविष्य आहेत. तुम्हा सर्वांकडून मिळालेले हे प्रेम आणि आपुलकी हीच देशसेवेतील माझी शक्ती आहे. आमच्या मुलींसाठी एक निरोगी, सुरक्षित आणि सुसज्ज राष्ट्र निर्माण करणे हे आमचे ध्येय आहे," असे पंतप्रधान मोदींनी आपल्या पत्रात म्हटले आहे.
 
पुढे त्यांनी लिहिले की, छत्तीसगडच्या लोकांकडून मला नेहमीच खूप प्रेम मिळाले आहे. देशाच्या प्रगतीच्या वाटचालीत या राज्यातील जनतेनेही उत्स्फूर्तपणे योगदान दिले आहे. तुमच्यासारख्या तरुण मित्रांसाठी आणि देशासाठी पुढची २५ वर्षे महत्त्वाची असणार आहेत.
 
या वर्षांत आमची तरुण पिढी, विशेषत: तुमच्यासारख्या मुली त्यांची स्वप्ने पूर्ण करतील आणि देशाच्या भविष्याला नवी दिशा देतील, असेही त्यांनी लिहिले आहे. तसेच खूप अभ्यास कर, पुढे जा आणि तुझ्या यशाने तुझ्या कुटुंबाला, समाजाला आणि देशाला गौरव मिळवून दे, असे म्हणत आकांक्षाच्या उज्ज्वल भविष्यासाठी पंतप्रधान मोदींनी तिला शुभेच्छा दिल्या आहेत.
अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121