मुंबई : "वाईकॉम सत्याग्रह हा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या (रा.स्व.संघ) सामाजिक परिवर्तनाच्या प्रयत्नांसाठी खऱ्या अर्थाने मार्गदर्शक प्रकाश आहे. समाजातील विविध घटकांतील लोकांना एकत्र आणून वायकोम सत्याहास यश मिळाले. संघ विचारसरणीच्या लोकांशी समन्वय साधून भारताला विजयी करण्याचे काम सध्या संघ करत आहे.", असे प्रतिपादन रा.स्व.संघाचे सरकार्यवाह दत्तात्रेय होसबळे यांनी केरळ येथे केले. वाईकॉम सत्याग्रह शताब्दी सोहळ्यानिमित्त वाईकॉम बीच मैदानावर नुकत्याच झालेल्या कोट्टायम विभाग सांघिकात ते बोलत होते. यावेळी वाईकॉम, पोनकुन्नम आणि कोट्टायम जिल्ह्यातील हजारो स्वयंसेवक सहभागी झाले होते.
उपस्थित स्वयंसेवकांना संबोधत सरकार्यवाह यावेळी म्हणाले की, "संघटित प्रयत्नातूनच राष्ट्र समृद्ध होते. संघटित समाजाच्या माध्यमातून राष्ट्राची सेवा आणि सुरक्षितताही सुनिश्चित करता येते. सामाजिक समरसतेचा संदेश हा संघाता मार्गदर्शक प्रकाश आहे. हाच आदर्श घेऊन वीर सावरकरांनी पतित-पावन मंदिराची स्थापना केली. शाखांच्या माध्यमातून स्वयंसेवकांनी या सर्वसमावेशक वर्तनाला त्यांच्या जीवनाचाच एक अपरिहार्य भाग बनवले आहे. सध्याचे सरसंघचालक डॉ. मोहनजी भागवत यांनीही मंदिरे, सार्वजनिक विहिरी आणि स्मशानभूमी सर्व लोकांसाठी, सर्व वर्ग आणि संप्रदायांसाठी खुल्या असाव्यात, असा उपदेश करून याच मुद्द्यावर जोर दिला. त्यामुळे आजचे हे सांघिक के. केलप्पन, टी.के. माधवन आणि मन्नथू पद्मनाभन यांसारखे कार्यकर्ते आणि लढवय्यांबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्याचे एक प्रतिक आहे." संघटित आणि साधनसंपन्न भारत जगासाठी वरदान ठरेल.
भारतात पार पडलेल्या जी-२० शिखर परिषदेचा संदर्भ देताना सरकार्यवाह म्हणाले की, "संघटित आणि साधनसंपन्न भारत जगासाठी वरदान ठरेल. "वसुधैव कुटुंबकम" या संदेशाने या शिखर परिषदेचा समारोप झाला. भारताच्या विकासाला चालना देणार्या विविध क्षेत्रांतील वाढ खरोखरच प्रेरणादायी आहे."