"कुंभकर्णानंतर जास्त काळ कुणी झोपलं असेल तर ते हिंदू! जागे व्हा!" धीरेंद्र शास्त्रींचे आवाहन

    07-Oct-2023
Total Views | 73
Baba Bageshwar in Rajasthan

जयपुर
: राजस्थानमधील अलवर येथे हनुमंत कथा सांगणारे बागेश्वर धामचे पंडित धीरेंद्र शास्त्री दि. ६ ऑक्टोबर रोजी माजी मंत्री भंवर जितेंद्र सिंह यांच्या निवासस्थानी असलेल्या फूलबाग पॅलेसमध्ये पोहोचले. तेथे त्याने चांदीच्या सिंहासनावर बसून धार्मिक सभा घेतली. यावेळी धीरेंद्र शास्त्री म्हणाले की, जितेंद्र सिंह सर्व लोकांना देवासमान मानतात.हिंदू राष्ट्राबाबत बोलताना ते म्हणाले की, हिंदू जागृत झाले नाहीत तर काश्मीरसारखी परिस्थिती निर्माण होईल.

पॅलेसमध्ये पोहोचल्यानंतर धीरेंद्र शास्त्री यांनी तिथे बांधलेल्या ठाकुरजींच्या मंदिराला साष्टांग नमस्कार केला.तेथे जमलेल्या लोकांना संबोधित करताना ते म्हणाले, “हिंदूंनो, जागे व्हा, नाहीतर काश्मीरसारखी स्थिती होईल. तुझ्या बहिणीची आणि मुलीची अवस्थाही साक्षीसारखी (दिल्लीतील पीडिता) होईल. तुमची घरेही जाळली जातील. म्हणून जागे व्हा. कोणालाही कमी लेखू नका, पंरतु सनातन धर्माला प्रगतीपथावर न्या, असे धीरेंद्र शास्त्री म्हणाले.

हिंदु राष्ट्राच्या संकल्पनेबाबत बागेश्वर धामचे पीठेश्वर म्हणाले, “तुम्ही हिंदू असाल तर घरोघरी ध्वज लावा. डोक्याला तिलक लावा. देशाला हिंदू राष्ट्र बनवण्यावर ठाम राहा. मी जिवंत राहिलो तर हिंदु राष्ट्र निर्माण करण्याचा संकल्प लवकरच पूर्ण होईल. तुम्ही मला साथ द्या, आम्ही मिळून तुम्हाला हिंदु राष्ट्र देऊ. पण त्यासाठी तुम्हाला घरातून बाहेर पडावे लागेल.”

शास्त्री पुढे म्हणाले, “जेव्हा वीर बजरंगी लंकेत रामाच्या नावाने ध्वज लावू शकतात, तेव्हा आपण आपल्या हृदयात रामाच्या नावाने भक्ती जागवू शकत नाही का? आपण रामाचे नाव घेतले तर लोक आपल्याला सनातनी म्हणतील असे लोकांना वाटते. रामाचे नाव घेऊन आम्ही कोणाचे नुकसान करत नाही. आम्हांला फक्त राम नामाच्या भक्तीचा संबंध आहे.

'कुंभकर्णापेक्षा जास्त काळ सनातनी झोपलेत' तसेच धर्मांतर करणारे मुर्ख आहेत.तसेच आपण जिवंत राहिलो तर हिंदूराष्ट्राचं स्वप्न स्वता:च्या डोळ्यांनी साकार होताना पाहिन, असे ही शास्त्री म्हणाले. त्याचबरोबर आपल्या लग्नाबाबत ते म्हणाले की, 'शेरवानी तयार ठेवा. मी लवकरच लग्न करणार आहे.'त्याचबरोबर धर्मांतर करणारे मुर्ख असून त्यांची दिशाभूल केली जाते. तरी त्यांनी सनातन धर्म स्विकारून घरवापसी करावी, असे ही धीरेंद्र शास्त्री म्हणाले. तसेच त्यांनी हिंदूंना संघटित होण्याचे आवाहन केले.



अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121