विश्वचषकाआधीच भारतीय संघाचे टेन्शन वाढले; भारताच्या हुकूमी एक्क्याला झाला डेंग्यु
06-Oct-2023
Total Views | 25
मुंबई : आयसीसी एकदिवसीय विश्वचषक २०२३ ची सुरूवात ५ ऑक्टोबरला इंग्लंड आणि न्यूझीलंड यांच्या सामन्याने झाली. आयसीसी वर्ल्डकपच्या वेळापत्रकानुसार भारत आपल्या खेळाची सुरुवात रविवारी, ८ ऑक्टोबरला ऑस्ट्रेलियाविरूद्धचा सामना खेळून करणार आहे. यासाठी भारताची जोरदार तयारी सुरू असताना सलामीवीर शुभमन गिलला डेंग्यूची लागण झाल्याची बातमी पुढे आली आहे.
ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या विश्वचषक सामन्यापूर्वी शुभमन गिलच्या आरोग्यविषयक समस्येमुळे तो ऑस्ट्रेलियाविरूद्धचा पहिला सामना खेळण्याची शक्यता कमी आहे. यामुळे भारतीय संघाच्या चिंतेत भर पडली आहे. गिलच्या अनुपस्थितीत रोहित शर्मासोबत इशान किशन सलामीला येण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
डेंग्यूच्या रूग्णांची शारीरिक स्थिति वेगवेगळी असते. त्यामुळे रूग्णाला व्यवस्थित होण्यासाठी साधारणपणे ७ ते १० दिवस लागतात. अशा परिस्थितीत सामन्याली केवळ २ दिवस उरले असताना सलामीवीर शुभमन गिल ऑस्ट्रेलिायविरूद्धच्या पहिल्या वनडे सामन्याला मुकण्याची शक्यता आहे.
आयसीसी एकदिवसीय विश्वचषक सामन्यात भारताकडून रोहित शर्मा, हार्दिक पंड्या, शुभमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल, रवींद्र जडेजा, रविचंद्रन अश्विन, शार्दुल ठाकूर, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज, कुलदीप यादव, मोहम्मद शमी, ईशान किशन, सूर्य कुमार यादव इ.खेळाडू खेळणार आहेत.