कलाकारांचा डेटाबेस तयार करण्यासाठी पु. ल. देशपांडे कला अकादमीचा पुढाकार

    05-Oct-2023
Total Views | 48

p l deshpande

मुंबई :
कोव्हीडच्या काळामध्ये कलाकारांचा डेटाबेस नसल्याने अनेकांना गैरसोय झाली होती. त्यामुळे पु. ल. देशपांडे कलाकादमीने मागील दीड वर्षात ज्यांना कुठेही संधी मिळाली नव्हती अशाच कलाकारांना, संस्थांना संधी देऊन कार्यक्रम आयोजित केले आहे. दरम्यान अनेक कलाकारांचा डेटाबेस नसल्याची खंत वरिष्ठ कलाकारांनी देखील मांडले आहे.

ही समस्या लक्षात घेऊन कलाकारांचा डेटाबेस तयार करण्यासाठी पु. ल. देशपांडे कलाकादमीकडून एक प्रणाली विकसित करण्यात आलेली आहे. कलाकारांनी अकादमीच्या www.pldeshpandekalaacademy.org या संकेतस्थळाला भेट देऊन कलाकार भांडार ह्या टॅब वर क्लिक करून माहिती भरावी. हा डेटाबेस अकादमीकडे असेल. ज्यांना ज्यांना असा डेटाबेस हवा असेल त्यांनी कृपया अकादमीशी ईमेल द्वारे संपर्क साधावा.
 
अकादमीच्या पुढील कार्यक्रमात देखील या डेटाबेस मधूनच कलाकारांची निवड करण्यात येइल. या प्रकल्पासाठी सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार आणि सचिव विकास खारगे यांचा पुढाकार असल्याची माहिती प्रकल्प संचालक, संतोष रोकडे यांनी दिलेली आहे. तरी सर्व कलाकारांनी ही या प्रणालीचा फायदा घ्यावा असे आवाहन आहे.

अग्रलेख
जरुर वाचा
धर्मांतरविरोधी कायदा आणि सध्याचा गोेव्यातील हिंदू समाज

धर्मांतरविरोधी कायदा आणि सध्याचा गोेव्यातील हिंदू समाज

गोवा म्हटले की नजरेसमोर येतात ती फुलांची आरस केलेली देवालये आणि नितांत सुंदर समुद्रकिनारे! मात्र, गेल्या काही वर्षांत हिंदू संस्कृतीच्या सर्व खुणा अभिमानाने मिरवणार्‍या गोव्यामध्ये, धर्मांतरणाच्या द़ृष्टचक्राने वेग घेतला आहे. इस्लामी आणि ख्रिस्ती धर्मांतरणामुळे भविष्यात गोव्यातील हिंदू लोकसंख्या धोक्यात येण्याची चिन्हे आहेत. त्यामुळेच धर्मांतरणविरोधी कायद्याची गरज नुकतीच गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी व्यक्त केली आहे. गोव्यातील धर्मांतरणाच्या या वाढत्या समस्येचा घेतलेला मागोवा.....

शिवदूर्गांचा जागतिक सन्मान: नेतृत्वाच्या प्रयत्नांची गाथा...

शिवदूर्गांचा जागतिक सन्मान: नेतृत्वाच्या प्रयत्नांची गाथा...

‘युनेस्को’ने शिवरायांच्या 12 गडकिल्ल्यांना जागतिक वारशाचा दर्जा नुकताच जाहीर केला. या घोषणेनंतर महाराष्ट्राची मान अभिमानाने पुन्हा एकदा उंचवली. त्याचबरोबर पुन्हा एकदा याचे श्रेय लाटण्याचा प्रयत्न, काहीजणांकडून जाणीवपूर्वक केला जात आहे. पण, प्रत्यक्षात महाराष्ट्राच्या शिरपेचात आलेल्या या यशाचे खरे मानकरी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हेच आहेत, यात कोणतीही शंका नाही. मुळात या गडकिल्ल्यांना वारसा दर्जा मिळण्याची संपूर्ण प्रक्रिया लक्षात घेतली, तर हे आपल्या नक्कीच लक्षात..

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121