मुंबई : 'रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया' अंतर्गत रिक्त पदांसाठी भरती केली जाणार आहे. रिझर्व्ह बँकेच्या अधिसूचनेनुसार "सहाय्यक" पदाकरिता अधिसूचना जारी करण्यात आली आहे. रिझर्व्ह बँकेतंर्गत "सहाय्यक" पदाच्या एकूण ४५० जागा भरल्या जाणार आहेत. सदर भरतीकरिता उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत.
तसेच, आरबीआयद्वारे होणाऱ्या भरतीसाठी उमेदवारांना अर्ज करण्यासाठी अंतिम मुदत दि. ०४ ऑक्टोबर २०२३ असणार आहे. तथापि, एससी, एसटी इत्यादी राखीव प्रवर्गांसाठी अर्ज शुल्क फक्त ५० रुपये आहे. भरतीसंदर्भात अधिक माहिती जाणून घेण्यासाठी
अधिकृत वेबसाईटला भेट द्या.