तलासरी : पालघर जिल्ह्यातील डहाणू तालुका भागातील असलेल्या गौवंशाला लंपी रोग झपाट्याने पसरत चाललेला आहे.लंपी नामक रोगाने अनेक भागात गाई-बैलांना मृत्यू झाले आहे.तलासरी डहाणू भागातील लंपी रोगाने पीडित असलेल्या गौवंशाला उपचार करिता डहाणू शहराचे विश्व हिंदू परिषद,बजरंगदल,गौरक्षक ऋषीकेश मालविया हे स्वतः पुढे येऊन आपल्या राहत्या घरातच गौवंश उपचार हेतू गौवंश केंद्र सुरु केले आहे.ऋषीकेश मालविया यांनी शेकडो गाई-बैलांचे ओषधो उपचार करुन जीव वाचविण्यात यश आले आहे.ऋषीकेश मालविया यांनी गौवंशाला उपचार हेतू घरीच गौसेवा उपचार केंद्र बनविल्याने सर्वत्र त्याची वाह वाह होत आहे.
तलासरी तालुक्यात ही तलासरी प्रखंडाचे गौरक्षक प्रमुख उज्वल झा त्याचे गौरक्षक साथीदार,ऋषी सिंग सुनीलसिंग राजपूत, राहुल यादव,निखिल शाह,आकाश राजभर,स्वप्नील वीर,हरी कापसे इत्यादी गौरक्षकांनी मुंबई-अहमदाबाद या राष्ट्रीय महामार्गावर गाई-बैलांचे वाहनांमुळे अपघात ग्रस्त झालेल्या गाई-बैलांना अधिक उपचार करिता जवळच उंबरगाव येथील पीडाग्रस्त गौशाळेत वाहनातून नेऊन गौमातेचे प्राण वाचविण्यात आले होते.