ठाकरे-परब...निलेश राणेंनी घेतला सगळ्यांचाच समाचार!
30-Sep-2022
Total Views |
मुंबई: शिवसेना नेते खासदार विनायक राऊत यांनी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्यावर टीका केली होती. राऊत यांच्या या टीकेला आता निलेश राणे यांनी प्रत्युत्तर दिले आहे. विनायक राऊत यांनी नारायण राणे यांचा 'कोंबडीचोर' असा उल्लेख केला असताना, त्यानंतर निलेश राणे यांनी विनायक राऊतांच्या टीकेचा जोरदार समाचार घेतला आहे.
"ठाकरेंची अब्रु रस्त्यावर आणायला राऊत जबाबदार असतील." असा इशारा निलेश राणे यांनी दिला आहे.विनायक राऊत यांनी नारायण राणे यांचा उल्लेख 'कोंबडीचोर' असा केला. "शिवसेना जेव्हा स्थापन झाली तेव्हा उद्धव ठाकरे हे सहा वर्षांचे होते, तर नारायण राणे हे चेंबूरच्या नाक्यावर कोंबडी कापत होते. हा या दोघांमधील फरक आहे. असं म्हणतात तिथे असलेल्या टॉकिजमध्ये तिकीट ब्लॅक करणं, कोंबड्यांच्या माना कापणं, म्हणून त्यांचं नाव कोबंडीचोर पडलं अशी टीका राऊत यांनी नारायण राणे यांच्यावर केली.
यावर निलेश राणे यांनी राऊतांच्या टीकेला जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. "कलानगरला राहणाऱ्या सम्राटाने घरातलीच कोंबडी कशी चोरली? महाराष्ट्राला कळू दे. राऊत औकातीत राहा, अन्यथा ठाकरेंची अब्रू रस्त्यावर आणण्यासाठी कारणीभूत ठराल." असा इशाराच राणेंनी दिला. अशोक चव्हाणांनी एकनाथ शिंदेंबाबत केलेल्या गौप्यस्फोटावरही निलेश राणेंनी प्रतिक्रिया दिली. अशोक चव्हाण ते पुराव्यानिशी कधीच बोलत नाहीत, असंही निलेश राणे म्हणाले. त्याचप्रमाणे, उद्धव ठाकरेंच्या नुकत्याच झालेल्या गटप्रमुखांच्या मेळाव्यावरही निलेश राणेंनी टीका केली. दसरा मेळाव्यालाही उद्धव ठाकरे फक्त टोमणे मारणार, रडत बसणार. असे ते म्हणाले.