भारतीय बौध्द महासभेच्या अध्यक्षपदाचा अॅड. जयेश सातपुते यांचा राजीनामा!
27-Aug-2022
Total Views | 44
मुंबई- भारतीय बौध्द महासभेचे मुंबईचे अध्यक्ष अॅड. जयेश सातपुते यांनी आपल्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला आहे. अध्यक्षपदाच्या कार्यकाळात अॅड. सातपुते यांनी अनेक समाज कल्याणकारी कामे केली आहेत. तरूणांमध्ये बुध्द तत्वज्ञानाचा आणि आंबेडकरी विचारांचा प्रसार ते करीत आहेत. राजीनाम्याबद्दलचे कारण अद्यापही स्पष्ट केलेले नाही.
स्टुडंट्स वेल्फेअर असोसिएशनचे ते संस्थापक अध्यक्ष आहेत. त्यांनी कोरोनाकाळात अनेक गरीब कुटुंबाना धान्यवाटप करुन मदत केली होती. दक्षिण मध्य मुंबई जिल्हा अध्यक्ष म्हणून त्यांनी सन 2012 ते 2017 या काळात काम केले होते. आदिवासी पाड्यामध्ये ते दरवर्षी शैक्षणिक साहित्याचे शाळांना वाटप करतात. विध्यार्थ्याच्या प्रश्नांच्या सोडवणुकीसाठी भरीव काम ते करीत आहेत. त्यांच्या राजीनाम्याची मुंबईत चर्चा सुरू आहे.