भाई जगताप पण बोलले 'पन्नास खोके'... पुढे काय घडलं वाचा सविस्तर!

    25-Aug-2022
Total Views | 196
dada bhuse
 
 
 
मुंबई : विधान परिषदेत चर्चेच्या दरम्यान काँग्रेस आमदार भाई जगताप यांनी पुन्हा एकदा शिंदे गटाला डिवचण्याचा प्रयत्न केला. अंतिम आठवडा प्रस्तावावर चर्चा करताना भाई जगताप मुंबईच्या प्रश्नांवर बोलत असताना अचानक त्यांनी शिंदे गटावर निशाणा साधत पन्नास खोक्यांचा पुनरुच्चार केला. जगताप यांनी निशाणा साधल्यानंतर शिंदे गटाकडून स्वाभाविकरित्या प्रत्युत्तर मिळाले खरे पण यावेळी शिंदे गटातर्फे यंदा किल्ला लढवला तो म्हणजे दादा भुसे यांनी. भाई जगतापांच्या आरोपांना प्रत्युत्तर देताना दादा भुसे यांचे कधीही पाहायला न मिळणारे आक्रमक रूप सभागृहाला पाहायला मिळाले.
 
 
भाई जगतापांच्या आरोपांवर बोलताना भुसे यांनी विधान परिषद निवडणुकीतील काँग्रेस उमेदवार चंद्रकांत हंडोरे यांच्या पराभवाची आठवण काढून देत काँग्रेसच्या वर्मावरच घाव घातला. 'तुमचे अधिकृत उमेदवार असलेल्या चंद्रकांत हंडोरे यांचा विधान परिषद निवडणुकीत पराभव झाला, तेव्हा कुणी खोके घेतले. तुमचे पहिल्या पसंतीचे अधिकृत उमेदवार सभागृहात निवडून का येऊ शकले नाहीत ?' असा सवाल दादा भुसे यांनी भाई जगताप यांनी विचारला.
 
अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121