विशालचा नवा अल्बम ‘तू संग मेरे’

    20-Aug-2022
Total Views | 182

disha  
 
 
मुंबई : मराठी बिग बॉसच्या तिसऱ्या पर्वाचा विजेता असलेल्या अभिनेता विशाल निकमच्या मनात सध्या कुणीतरी घर केलंय... त्याच्या मनातील ती व्यक्ती कोण हे लवकरच त्याच्या चाहत्यांना समजणार आहे. ‘तू संग मेरे’ असं म्हणत त्याने आपल्या प्रेमाची खुलेआम कबुली दिली आहे. व्हिडीओ पॅलेसची निर्मीती असलेल्या ‘तू संग मेरे’ या हिंदी रोमँटिक अल्बममध्ये विशाल झळकणार आहे. त्यासोबत दिसणार आहे सुंदर, गुणी अभिनेत्री दिशा परदेशी.
 
 
 
‘तू संग मेरे रंग भरे... कहने दे जो दिल ये कहे...
हाथ ये तेरा हाथ में... मेरे साथ ये ऐसा रहे...
 
 
 
असे बोल असलेल्या या गीतातून त्याची दिशा सोबतची ‘प्यारवाली’ केमिस्ट्री दिसणार आहे. रोहितराज कांबळे याने लिहिलेल्या आणि संगीतबद्ध केलेल्या या गाण्याला हर्षवर्धन वावरे याने स्वरबद्ध केले आहे. काश्मीरच्या नयनरम्य लोकेशन्सवर चित्रीत झालेल्या या गाण्याचे दिग्दर्शन फुलवा खामकर हिने केले आहे. छायांकन अमोल गोळे यांचे आहे.
   
 
disha
 
 
आपल्या पहिल्या हिंदी अल्बमविषयी विशाल सांगतो,‘या हिंदी गाण्यासाठी व्हिडीओ पॅलेसने मला दिलेली ही संधी खूप महत्त्वाची आहे. अभिनेत्री दिशा परदेशी सांगते की, वेगळा अनुभव याशूट दरम्यान मी घेतला. आमची लव्हेबल जोडी आणि हे रोमँटिक गाणं सर्वांना नक्कीच आवडेल.
अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121