भ्रष्टाचाऱ्यांना फैलावर घेणाऱ्या सोमैय्यांचा संवेदनशीलपणा

    17-Aug-2022
Total Views | 126
 
ks
 
 
मुंबई : एरव्ही किरीट सोमय्या आपल्या स्फोटक पत्रकार परिषदांद्वारे विरोधकांना धारेवर धरतात. भ्रष्टाचाऱ्यांची पोलखोल करतात. मात्र, सोमय्यांच्या संवेदनशीलपणाची अनुभूती हृदयरोगावर उपचार घेणाऱ्या घाटकोपरच्या नरेंद्र विश्वकर्मा यांना आली. विश्वकर्मा यांच्यावर १६ ऑगस्ट २०१७ रोजी हृदय प्रत्यारोपणाची शस्त्रक्रीया पार पडली होती. या घटनेला पाच वर्षे पूर्ण झाल्यानंतर आपण ठणठीत आणि उत्तम असल्याचे विश्वकर्मा यांनी दै. ''मुंबई तरुण भारत'शी बोलताना सांगितले.
 
ते म्हणाले, "पाच वर्षांपूर्वी अचानक छातीत दुखण्याचा त्रास सुरू झाला होता. डॉक्टरांकडे गेल्यावर हृदयरोगाचे निदान झाले होते. डॉक्टरांनी हृदय प्रत्यारोपण शस्त्रक्रीयेचा सल्ला दिला होता. मात्र, परिस्थितीमुळे ही शस्त्रक्रीया करणे शक्य नसल्याने आम्ही चिंतेत होतो. त्यानंतर एका सहकाऱ्याने आमची व्यथा किरीटभाईंकडे मांडली. सोमय्यांनी आमची समस्या पूर्णपणे लक्षात घेऊन योग्य ती मदत करण्याचे आश्वासन दिले."
 
हृदय प्रत्यारोपण शस्त्रक्रीयेची व्यवस्था झाली होती. मात्र, हृदय मिळत नसल्याने आठ दिवस प्रतीक्षा करावी लागली होती. २०१७ रोजी १६ ऑगस्ट रोजी शस्त्रक्रीया पार पडली. त्यानंतर औषधोपचार आणि नियमित डॉक्टरांच्या सल्ल्यानंतर पाच वर्षांनंतरही कुठल्याही त्रासाविना मी निरोगी आयुष्य जगत आहे, असेही विश्वकर्मा म्हणाले.
 
नरेंद्र विश्वकर्मा यांनी सोमय्यांना याबद्दलचा मेसेजही केला आहे. त्यात ते म्हणतात, "आज माझ्या हृदय प्रत्यारोपणाच्या शस्त्रक्रियेला पाच वर्ष पूर्ण झालेली आहेत आणि आता मी माझे जीवन अतिशय आनंदाने जगतो आहे, अशा या आनंदाच्या क्षणी आपले योगदान मी कधीही विसरू शकणार नाही."
ही हृदय प्रत्यारोपणाची शस्त्रक्रिया नरेंद्र यांच्यावर १७ ऑगस्ट २०१७ या दिवशी युवक प्रतिष्ठान मुलुंड यांच्या सहयोगाने फोर्टिस रुग्णालयात केली होती.
- किरीट सोमय्या
 
 
 
अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121