नवी दिल्ली : बहुप्रतीक्षित ५ जी लिलावाची प्रक्रिया मंगळवारपासून सुरु झाली आहे. पहिल्याच दिवशी १ लाख ४५ हजार कोटींची बोली लावली गेली. त्यामुळे भारतीय दूरसंचार क्षेत्रातील उद्योजकांकडून या लिलावाचे भरगच्च स्वागत होत आहे. भारतातील सर्वच अग्रगण्य टेलिकॉम कंपन्या म्हणजे रिलायन्स जीओ, भारती एअरटेल, व्होडाफोन आयडिया, अडाणी नेटवर्क्स या सर्वच कंपन्यांनी या लिलावांमध्ये रस दाखवला आहे. सरकारला या लिलावांमधून ४.३ लाख कोटी रुपयांचे उत्पन्न अपेक्षित आहे.
देशात सध्या सुरु असलेल्या ४ जी नेटवर्कची जागा घेत येत्या १५ ऑगस्ट पासून देशात ५ जी नेटवर्क सुरु होईल. २० वर्षांसाठी या स्पेक्ट्रमसचे हक्क वितरित केले जातील. या ५ जी सेवेच्या आगमनाने नागरिकांना अजून वेगवान इंटरनेट वापराता येणार आहे. सध्याच्यापेक्षा कितीतरी पटीने जास्त स्पीडने आता काम करता येणार आहे. भारताच्या डिजिटल क्रांतीच्या दिशेने हे मोठे पाऊल असणार आहे.