देशाच्या १५व्या राष्ट्रपती म्हणून सोमवार,दि. २५ जुलै रोजी संसदेच्यासेंट्रल हॉलमध्ये सरन्यायाधीशांनी द्रौपदी मुर्मू यांना पद व गोपनीयतेची शपथ दिली आणिजगतील सर्वात मोठे राष्ट्रप्रमुखांचे निवासस्थान असलेल्या दिल्लीस्थित राष्ट्रपती भवनातद्रौपदी मुर्मू विराजमान झाल्या. भारतात ९टक्के लोकसंख्या असलेल्या वनवासी समाजातील महिला सर्वोच्च पदावर पोहचण्यासाठी ७० वर्षेवाट पाहावी लागली.
द्रौपदी मुर्मू यांचा जन्म २० जून १९५८ रोजी ओडिशातीलमयूरभंज जिल्ह्यातील बडीपोसी गावात झाला. त्यांच्या वडिलांचे नाव बिरांची नारायण तुडूआहे. द्रौपदी मुर्मू ह्या ओडिसातील संथाळ नावाच्या एका आदिवासी जमातीच्या आहेत.त्यांचेवडील आणि आजोबा दोघेही पंचायती राज प्रणाली अंतर्गत गावप्रमुख होते. १९७९ मध्ये भुवनेश्वरच्यारमादेवी महिला विद्यापीठातून द्रौपदी मुर्मू यांनी कला शाखेतील पदवी प्राप्त केली.
द्रौपदी मुर्मू यांनी श्याम चरण मुर्मू यांच्याशी लग्न केले. या जोडप्याला दोन सुपूत्रआणि एक कन्यारत्न प्राप्त झालं. मात्र, दोन्ही मुलांचंअकाली निधन झालं. त्यांनी ओडिशा सरकारसाठी लिपिक म्हणून आपल्या व्यावसायिक कारकिर्दीचीसुरुवात केली. पुढे त्या पाटबंधारे आणि ऊर्जा विभागात कनिष्ठ सहाय्यक झाल्या. नंतरच्याकाळात त्यांनी शिक्षिका म्हणूनही काम केले. त्यांनी श्री अरबिंदो इंटिग्रल एज्युकेशनअँड रिसर्च सेंटर, रायरंगपूर येथे मानद शिक्षिका म्हणून अनेकवर्षे काम केले.
मुर्मू १९९७ मध्ये रायरंगपूर नगर पंचायतीच्या नगरसेविका म्हणून निवडून आल्या होत्या.त्यांनी भारतीय जनता पार्टी अनुसूचित जमाती मोर्चाच्या राष्ट्रीय उपाध्यक्षा म्हणूनहीकाम केले आहे. ओडिशातील भारतीय जनता पक्ष आणि बिजू जनता दल युती सरकारच्या काळात,त्या ६ मार्च २००० ते ६ ऑगस्ट २००२ पर्यंत वाणिज्य आणि परिवहन राज्यमंत्रीतर ६ ऑगस्ट २००२ ते १६ मे २००४ पर्यंत मत्स्यव्यवसाय आणि पशु संसाधन विकास राज्यमंत्रीहोत्या.
२०००-२००४ आणि २००४-२००९ मध्ये रायरंगपूर विधानसभा मतदारसंघातील आमदार होत्या. त्यांच्याउत्कृष्ट कामगिरीबद्दल त्यांना २००७ मध्ये ओडिशा विधानसभेने 'सर्वोत्कृष्ट आमदार' म्हणून नीलकंठ पुरस्काराने सन्मानितकेले. त्या झारखंडच्या पहिल्या महिला राज्यपाल होत्या. आणि आता आदिवासी समाजातील प्रथमराष्ट्रपती. शपथविधीनंतर त्यांनी आपल्या भाषणात आपल्या कामाची चुणक दाखवून दिली. जनतेचेकल्याण हेच माझे ध्येय असून त्यासाठी सतत कार्यरत राहणार, समाजातीलप्रत्येक घटकांचा विचार करणार, जगाला भारताकडून मोठ्या अपेक्षाअसल्याने युवा पिढी देशाची मोठी शक्ती असल्याचे त्यांनी सांगितले.
आत्मनिर्भर भारत, डिजिटल इंडिया, जलदगतीनेकाम, महिला विकास, एक भारत श्रेष्ठ भारतयासह गरीब जनतेचं स्वप्न सत्यात आणण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे सांगितले. मॅडमप्रेसिडेंट द्रौपदी मुर्मू यांना सर्व शिक्षकांकडून खूप खूप शुभेच्छा !
-अनिल बोरनारे सहाय्यक शिक्षक,
स्वामी मुक्तानंदहायस्कूल चेंबूर मुंबई
(लेखक भाजपा शिक्षक आघाडीचे प्रदेश सहसंयोजक आहेत.)