‘एका महिन्यात तुझा शिरच्छेद करू’ भाजपचे प्रवक्ते प्रशांत उमराव पटेल यांना धमक्या, एफआयआर दाखल

ज्ञानवापीमध्ये शिवलिंग असल्याच्या वक्तव्यावरून धमक्या!

    03-Jun-2022
Total Views | 133
ru
 
नवी दिल्ली: सर्वोच्च न्यायालयाचे वकील आणि भाजपचे प्रवक्ते प्रशांत उमराव पटेल यांनी एका अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुरुवारी 'एफआयआर' दाखल केला आहे. त्यांना शिरच्छेद करण्याची धमकी देण्यात आली होती. इकोटेक-३ पोलिस स्टेशनमध्ये ही एफआयआर दाखल करण्यात आली आहे. गुरुवारी दि.०२ रोजी दुपारी १२:५७ वाजता त्याला एका मोबाईल क्रमांकावरून फोन कॉलद्वारे जीवे मारण्याच्या धमक्या आल्या.
 
ज्ञानवापी मशिदीच्या मुद्द्यावर झालेल्या एका टीव्ही वादविवादात सहभागी झाल्यानंतर प्रशांत उमराव यांना जीवे मारण्याच्या धमक्या आल्या आहेत. “ज्या व्यक्तीने फोन केला त्याने सांगितले की, ज्ञानवापी मशिदीतील वादग्रस्त वास्तूमध्ये सापडलेले शिवलिंग प्रत्यक्षात एक कारंजे होते. त्याने मला धमकावले आणि माझ्यावर पैगंबर विरुद्ध बोलल्याचा आरोप केला. ज्ञानवापी मशिदीत कारंजे नाही आणि नुकताच सापडलेला शिवलिंग असल्याचे सांगून त्याने मला धमकावले,” असे भाजप नेत्याने दाखल केलेल्या तक्रारीत नमूद केले आहे. वादग्रस्त ज्ञानवापी संरचनेत शिवलिंग असल्याच्या चर्चेनंतर प्रशांतला सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इन्स्टाग्रामवर जीवे मारण्याची धमकीही मिळाली आहे. "आमचा धर्म आम्हाला इतर कोणत्याही धर्माचा अपमान करण्यास शिकवत नाही. इंशाअल्लाह लवकरच तुमचे डोके तुमच्या शरीरापासून वेगळे केले जाईल" या आशयाची धमकी आली आहे. प्रशांत यांनी इंस्टाग्रामवर मिळालेल्या जीवे मारण्याच्या धमकीचा स्क्रीनशॉट ट्विटरवर पोस्ट केल्यावर ही घटना उघडकीस आली. उत्तर प्रदेश पोलिसांनी या ट्विटची दखल घेतली आणि उत्तर प्रदेशातील ग्रेटर नोएडा येथील इकोटेक -3 पोलिस स्टेशनमध्ये आता अहवाल नोंदवला गेला आहे आणि या प्रकरणाची चौकशी सुरू असल्याचे सांगितले.
अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121