मुंबई : १९ वर्षांखालील क्रिकेटमध्ये आपल्या जलदगती गोलंदासाठी प्रसिद्ध असणाऱ्या शिवा मोर्याला पंचांनी दिलेल्या अनोख्या शिक्षेची चर्चा सध्या सोशल मीडियावर होत आहे. गिरगावचा शिवा मौर्या आपल्या जलद गोलंदाजीसाठी प्रसिद्ध आहे. अनोख्या शैलीत फलंदाजाला बाद करणे हे त्याचे कौशल्य आहे. मात्र, गोलंदाजीपेक्षा त्याला मिळालेल्या शिक्षेची आणि त्याच्या कारनाम्याची चर्चा आहे.
आयपीएल सामन्यांसाठीही तो आपले नशीब आजमावण्याच्या प्रयत्नात आहे. १२ जून रोजी झालेल्या क्रीकेट सामन्यात शिवााने आपल्या भेदक गोलंदाजीने साऱ्यांचीच मने जिंकलीत. या सामन्यात प्रतिस्पर्ध्याचा असा त्रिफळा उडवला की स्टंपचे दोन तुकडे पडले. शिवाची वेगवान गोलंदाजी पाहून पंचही अचंबित झाले.
त्यांच्या संघात एकच जल्लोष सुरू झाला. स्टंप तुटण्याची शिक्षा म्हणून पंचांनी शिवाला पार्टी द्यावी लागेल, असा मिश्कील टोला लगावला. एकेकाळी सचिन तेंडुलकर, सौरभ गांगुली यांनी बिल्डिंगच्या काचा फोडत आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्पर्धेत पदार्पण केले आणि अनेक इतिहास रचले. त्याचप्रमाणे शिवा मौर्या असेच इतिहास रचेल अशी अपेक्षा त्याच्या प्रशिक्षकांना आहे.