तारक मेहता मधून आणखी एका कलाकाराची एक्झिट

    10-Jun-2022
Total Views | 80

tappu
 
 
 
 
गेली अनेक वर्ष 'तारक मेहता का उलटा चश्मा' हा टेलीव्हिजन विश्वातील चर्चेचा विषय आहे. ह्या मालिकेतील सर्वच कलाकारांनी प्रेक्षकांच्या मनावर राज्य केले आहे. पण गेल्या काही दिवसांपासून चाहते मालिकेबाबत नाराजी व्यक्त करत आहेत, कारण मालिकेतील जवळजवळ निम्मे कलाकार एकामागून एक मालिका सोडून जात आहेत.
 
 
 
 
 
काही दिवसांपूर्वी तारक मेहता ही भूमिका साकारणारे शैलेश लोढा यांनी मालिकेला रामराम ठोकणार ही बातमी पसरली होती. त्यानंतर चाहत्यांमध्ये बबिता म्हणून प्रसिद्ध असलेली अभिनेत्री मुनमुन दत्ता सुद्धा मालिकेतून एक्झिट घेत आहेत अशी बातमी कानावर आली आहे. आणि अशा चर्चा सुरु असतानाच आता मालिकेतून टप्पू देखील निरोप घेणार अशी चर्चा सुरु झाली आहे.
 
tappu
 
 
 
ह्या मालिकेतील महत्त्वाचे पात्र असलेल्या टप्पूने आणि टप्पूसेनेने अनेक वर्ष प्रेक्षकांचे मनोरंजन केले आहे. मध्यंतरी टप्पूची भूमिका करणारा कलाकार बदलला पण मालिकेची लोकप्रियता तशीच राहिली. परंतु आता हा टप्पू म्हणजेच राज अनादकट हा गेले अनेक भाग मालिकेत दिसला नाही त्यामुळे आता राज सुद्धा मालिका सोडत आहे ही चर्चा आत्ता सुरु आहे.
अग्रलेख
जरुर वाचा
नर्स निमिषा प्रियाच्या फाशीला स्थगिती द्या! सुप्रीम कोर्टात तातडीची याचिका दाखल

नर्स निमिषा प्रियाच्या फाशीला स्थगिती द्या! सुप्रीम कोर्टात तातडीची याचिका दाखल

केरळमधील नर्स निमिषा प्रिया हिला दि.१६ जुलै रोजी येमेन येथे होणाऱ्या फाशीला स्थगिती मिळावी, यासाठी सर्वोच्च न्यायालयात तातडीची याचिका ‘सेव्ह निमिषा प्रिया अ‍ॅक्शन कौन्सिल’ या स्वयंसेवी संस्थेकडून दाखल करण्यात आली आहे. न्या. सुधांशू धुलिया आणि जयमाल्या बागची यांच्या खंडपीठासमोर वरिष्ठ वकील रागेंथ बसंत यांनी याचिकेत बाजू मांडताना म्हटले की, “शरीयत कायद्यानुसार ही फासी रोखता येते. त्यासाठी केंद्र सरकारने या प्रकरणात तातडीने लक्ष्य देण्याकरीता आपण निर्देश द्यावे.” अशी विंनती त्यांनी न्यायालयासमोर केली...

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121