मुंबई : बाबरी मशीद पाडली असा दावा करणाऱ्या शिवसेनेचा खोटेपण विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी उघड केला असतानाच, भाजप आमदार नितेश राणे यांनी बाबरी मशीद पाडली गेली तेव्हा संजय राऊत यांनी कशी त्यावर टीका केली होती हे लोकसत्ताच्या लोकप्रभा अंकातील राऊत यांचा लेख दाखवून संजय राऊत यांचे पितळ उघडे पाडले. 'रामाची राजकीय फरफट' असे त्या लेखाचे नाव असून राम आता ईश्वर राहिलेला नसून आता राजकीय प्यादे झाला आहे अशी टिका या लेखातून केली आहे.
राजकीय धुक्याने आणि उद्धवस्त मंदिराच्या धुक्याने श्रीराम कोंदटलें गेले आहेत त्यांची सुटका कोण करणार? एक मंदिर वाचवण्यासाठी अन्य मंदिरांवर बुलडोझर फिरवण्याचे कारण काय? असे प्रश्न या लेखातून विचारले आहेत. यातून या घटनेवर राऊत टीकाच केली होती असे या लेखातून स्पष्ट होते. देवेंद्र फडणवीस यांनी केलेल्या टीकेला सीबीआयचा अहवाल वाचावा, त्यातील शिवसेनेच्या नेत्यांची नावे दिसतील असे आव्हान संजय राऊत यांनी दिले होते. याच संजय राऊत यांनी त्यावेळी टीका केली होती आणि त्यावर बोलणे म्हणजे राऊत यांचा हलकटपणा आहे अशी टीका नितेश राणे यांनी केली आहे.