अंबाला : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे uddhav thackarey यांच्यावर राणा दाम्पत्य प्रकरणात गुन्हा दाखल झाला आहे. हनुमान चालीसा प्रकरणावरून नवनीत राणा, रवी राणा या दांपत्यावर राजद्रोहाचा गुन्हा दाखल करणाऱ्या मुख्यंमत्री उद्धव ठाकरे यांच्यावर ब्राह्मण महापंचायतचे राष्ट्रीय अध्यक्ष विरेश शांडिल्य यांनी कलम २९५ - A अंतर्गत धार्मिक भावना दुखावल्याचा गुन्हा दाखल केला आहे.
"कुठल्याही हिंदूंच्या धार्मिक भावना दुखावण्याचा अधिकार महाराहाष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे uddhav thackarey यांना नाही. हनुमान चालीसा म्हणणे राजद्रोहाचा गुन्हा मानणाऱ्या उद्धव ठाकरे सरकारला आम्ही माफ करणार नाही" असा इशारा वीरेश शांडिल्य यांनी गुन्हा दाखल करताना दिला.
दिवंगत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्याबरोबर शिवसेनेचे हिंदुत्व संपत झाले, त्यांनी हिंदुहृदयसम्राट या पदवीपुढे पंतप्रधानपदाला ठोकर मारली पण त्यांची सगळी इभ्रत त्यांचा मुलगा उद्धव ठाकरे uddhav thackarey यांनी फक्त सत्तेसाठी मातीत मिळवली. महाराष्ट्रात हिंदूंच्या भावनांशी खेळ केला जातोय तेव्हा राष्ट्रपती राजवट लागू करावी अशी मागणी या वेळी शांडिल्य यांनी केली आहे.