मुंबई: रशिया- युक्रेन युद्धाचे परिणाम भारतीय अर्थव्यवस्थेवर बघायला मिळत आहेत. डॉलरच्या तुलनेत रुपयाची घसरण सुरूच आहे. प्रती डॉलर ७७ रुपयांच्या नीचांकी पातळीवर रुपया पोहोचला आहे. या घसरणीमुळे भारताची आयात महाग होणार असून त्यामुळे महागाईमध्ये वाढ होण्याची शक्यता आहे.
या पार्श्वभूमीवर जागतिक बाजारातील रुपयाची किंमत सावरून राहावी यासाठी भारतीय रिझर्व्ह बँकेने आपल्या परकीय चलनसाठ्यातील डॉलर्स विकायला सुरुवात केली आहे. आता पर्यंत रिझर्व्ह बँकेने २ अब्ज डॉलर्स विकले आहेत.