पंतप्रधान मोदींनी हस्ते झाले पुणे मेट्रोचे उद्घाटन

दिव्यांग मुलांसोबत केला मेट्रोचा प्रवास

    06-Mar-2022
Total Views | 100
                 
narendra modi
 
 
 
पुणे: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी पुण्यातील बहुचर्चित मेट्रोसेवेचे उद्घाटन केले. या उद्घाटन प्रसंगी त्यांनी दिव्यांग मुलांसोबत मेट्रोचा प्रवाससुद्धा केला. पुणे महापालिकेतील महात्मा फुले यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून या कार्यक्रमाची सुरुवात झाली. यानंतर पंतप्रधानांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्याचे अनावरण केले. पुणे मेट्रोसेवेचे उद्घाटन केल्यानंतर मोदी आणि मेट्रोतून गरवारे महाविद्यालय ते आनंदनगर असा प्रवास केला. या प्रवासादरम्यान दिव्यांग मुलेही सोबत होती. मोदी यांनी या मुलांची अत्यंत आस्थेने विचारपूस केली, एवढ्या मोठ्या पदावरची व्यक्ती आपल्याशी संवाद साधत आहे हे बघून मुलेही भारावून गेली.
 
 
या प्रसंगी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी, उपमुख्यमंत्री अजित पवार, विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस, पुणे महानगराचे महापौर मुरलीधर मोहोळ आणि अनेक मान्यवर उपस्थित होते. या प्रसंगी पंतप्रधानांनी पहिले मेट्रोचे तिकीट काढले आणि मग प्रवास केला. यातून त्यांनी प्रत्येकानेच तिकीट काढूनच प्रवास केला पाहिजे आणि नियमांचा आदर प्रत्येकानेच केला पाहिजे असा आदर्शच घालून दिला. पुणे मेट्रोचे एकूण अंतर ३२.२ किलोमीटर आहे.
 
 
 
अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121