नवी दिल्ली: भारतातील फूड डिलिव्हरी क्षेत्रातील अग्रगण्य कंपनी झोमॅटोने आता अजून त्यांच्या ग्राहकांसाठी एक नवीन खुशखबर आणली आहे. आता झोमॅटो मार्फत फक्त १० मिनिटांत फूड डिलिव्हरी होणार आहे. या वैशिष्ट्यपूर्ण प्रकारासाठी त्यांनी एक नवीन मेन्यू कार्डसुद्धा तयार केले आहे. कंपनीचे संस्थापक दीपिंदर गोयल यांनी याबाबत घोषणा केली आहे. "याआधी आम्ही ३० मिनिटांत डिलिव्हरी करत होतो. पण त्यात काहीतरी नवीन कर्णाचे आम्ही ठरवले आहे. आम्ही हे नाही केले तर दुसरे कोणीतरी हे करेल" असे दीपिंदर गोयल यांनी एका ब्लॉग द्वारे केली आहे.
या नव्या मेन्यू कार्ड मध्ये काही ठराविकच पदार्थ असणार आहेत. जसे की ब्रेड आम्लेट, पोहे, बिर्याणी, मोमोज, चहा. कॉफी यांसारखे पटकन बनवून देता येतील असेच पदार्थ असणार आहेत. जरी डिलिव्हरीचा वेळ कमी झाला असला तरी स्वच्छतेच्या बाबतीत कुठलीच तडजोड करणार नाही असे झोमॅटोने जाहीर केले आहे. यासाठी झोमॅटोच्या डिलिव्हरी बॉईजना प्रशिक्षण दिले जात आहे. ही सेवा लवकरच चालू होईल.