मुंबई: "फेब्रुवारी महिना अखेरीपर्यंत मुंबई मध्ये पूर्ण अनलॉक होण्याची शक्यता आहे" असं मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. या अनलॉक साठी मुख्यमंत्र्यांसह संपूर्ण टीम आग्रही असल्याचेही त्यांनी सांगितले. मुंबईतील कोरोना केसेस कमी होण्याच्या पार्शवभूमीवर मुंबई पूर्ण अनलॉक च्या वाटेवर आहे अशी माहिती मुंबईच्या अतिरिक्त आयुक्तांनी दिली होती. त्यावर मुंबईच्या महापौरांनी पत्रकार परिषदेमध्ये हे महत्वाचे विधान केले आहे.
"मुंबई मध्ये १०० टक्के लसीकरण लवकरच पूर्ण होईल. १५ -१८ वयोगटातील लसीकरण सुद्धा लवकरच पूर्ण करू. सध्या मुंबईत एकाच इमारत प्रतिबंधित आहे पण तीही ८ दिवसांत मोकळी होईल अशी माहिती महापौरांनी दिली आहे. दरम्यान कोरोनाचे सनकोट पूर्णपणे जात नाही तोपर्यंत मास्क सक्ती कायमच राहील असेही त्यांनी स्पष्ट केले.