नवी दिल्ली : पाकिस्तानला सध्या तालिबानकडून धोका वाटत चिन्ह दिसत आहेत. अफगाणिस्तानमधून पाकिस्तानवर होणाऱ्या हल्ल्यांमुळे सध्या पाकिस्तान चिंतेत आहे. संयुक्त राष्ट्रसंघाच्या सुरक्षा परिषदेमध्ये सीमेवरुन दहशतवादी हल्ल्यांचे समर्थन करणाऱ्यांना जबाबदार धरण्याचा आग्रह पाकिस्तानकडून धरण्यात आला आहे. मागील काही दिवसांपासून पाकिस्तानमधील बलुचिस्तानमध्ये अनेक हल्ले झाले झाले असून या तीन हल्ल्यांमध्ये पाकिस्तानी लष्कराचे तब्बल १७ सैनिक मारले गेले आहेत. या हल्ल्यामध्ये पाकिस्तानच्या एका लष्करी अधिकाऱ्याचाही मृत्यू झाला आहे.
या हल्ल्यानंतर पाकिस्तान इंटर सर्व्हिसेस पब्लिक रिलशन्सने म्हटले होते की, पाकिस्तानच्या बलुचिस्तानमध्ये हल्ले करणारे हे अफगाणिस्तानमधील आपापल्या प्रमुखांसोबत बोलत असल्याचे आम्ही इंटरसेप्ट केले होते. तसेच पाकिस्तानचे प्रतिनिधी उमर सिद्दिकी यांनी संयुक्त राष्ट्रसंघाला आग्रह करत म्हटले होते की, पाकिस्तानवर हल्ले करण्यासाठी अफगाणिस्तानच्या भूमीचा वापर करण्यात येऊ नये.
तालिबानने ऑगस्ट २०२१ मध्ये अफगाणिस्तानमध्ये नियंत्रण मिळविल्यानंतर पाकिस्तानमधील हल्ले सतत वाढू लागले आहेत. मागील काही महिन्यांमध्ये तहरिक-ए-तालिबान पाकिस्तानने (टीटीपी) अनेक हल्ले केले आहेत. काबूलमध्ये तालिबानने नियंत्रण मिळविल्यानंतर टीटीपीने तालिबानला शुभेच्छा देखील दिल्या होत्या. त्याचबरोबर पाकिस्तानमध्ये एक इस्लामी कायदे आणि मुस्लिम स्टेट लागू करण्यासाठी प्रयत्न सुरु ठेवण्याची शपथ टीटीपीने घेतली असून पाकिस्ताचे लष्कर मागील अनेक वर्षांपासून टीटीपीशी लढा देत आहे.