शिवसेना माजी नगराध्यक्षांवर कारवाईची टांगती तलवार

माजी नगराध्यक्षांबाबत सुनावणी घेण्याचे उच्च न्यायालयाचे जिल्हाधिकारी यांना आदेश

    16-Feb-2022
Total Views | 292

hc
 
 
मुंबई : माथेरान येथील शिवसेनेच्या माजी नगराध्यक्ष प्रेरणा सावंत व त्यांचे पती प्रसाद सावंत यांनी पदाच्या कार्यकाळात नगरपालिका प्रशासन हॉर्सलॅंड हॉटेल येथे अनधिकृत बांधकामावर कारवाई करत असताना मुख्याधिकारी सागर घोलप याना कारवाई करण्यास मज्जाव केला होता. सदर प्रकरणी तत्कालीन मुख्याधिकारी सागर घोलप यांनी सावंत दाम्पत्यावर कारवाई करावी याबाबत जिल्हाधिकारी यांना कळवले होते. तसेच माथेरानचे माजी नगरसेवक व ज्येष्ठ नागरिक रघुनाथ भागोजी कदम यांनी याबाबत नगराध्यक्ष व गटनेत्याचे निलंबन करावे असा तक्रारी अर्ज जिल्हाधिकारी कार्यालयात दाखल केले होते.
 
 
परंतु जिल्हाधिकारी प्रशासन यांनी कोणतीच कारवाई न केल्याने रघुनाथ कदम यांनी मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली होती. सदर बाबत दिनांक १६ फेब्रुवारी २०२२ रोजी न्यायमूर्ती काथावाला व मिलिंद जाधव यांच्या खंडपीठासमोर सुनावणी झाली असता जिल्हाधिकारी रायगड यांना उच्च न्यायालयाने ४ आठवड्यामध्ये कदम यांना व्यक्तीगत सुनावणी देऊन याविषयी निकाल देण्याचे आदेश दिले आहेत. यामुळे माथेरानच्या माजी नगरअध्यक्ष यांच्यासह शिवसेना गटनेत्यावर व त्यांनी वाचवलेल्या अनधिकृत बांधकामाबाबत कारवाईची टांगती तलवार आहे. सेनेसाठी हा दुसरा मोठा झटका मानला जात आहे.
 
 
अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121