आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर झालेल्या बैठकीत ठाकरेंनी दिले 'हे' महत्वाचे आदेश !

- किशोरी पेडणेकरांनी दिली माहिती

    23-Nov-2022
Total Views |

किशोरी पेडणेकर
 
 
 
मुंबई : उ. बा. ठा. गटाचे नेते उद्धव ठाकरे यांनी पक्ष पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना आगामी निवडणुका, महापालिका आणि सिनेटच्या निवडणुकीसाठी कामाला लागण्याचे आदेश दिले आहेत. "एकमेकांशी समन्वय साधून काम करा. आपल्याला जिंकण्यासाठीच मैदानात उतरायचं आहे." अशी माहिती प्रवक्त्या किशोरी पेडणेकर यांनी माध्यमांशी संवाद साधताना दिली. यावेळी आमदार, खासदार, माजी आमदार, माजी खासदार, नगरसेवक आणि विधानसभेचे पराभूत उमदेवारही उपस्थित होते.
 
 
"सर्वच राजकीय पक्षांच्या निवडणुकीच्या तयारीच्या बैठका सुरू आहेत. त्यामुळे उद्धव ठाकरे यांनीही या संदर्भात बैठक घेतली असून निवडणुकीच्या कामाला लागण्याचे आदेश दिले आहेत. सिनेटपासून ते इतर सर्व निवडणुकीत कसे काम करायचे याचे मार्गदर्शन उद्धव ठाकरे यांनी दिलं आहे. महापालिका आपल्याकडेच राहणार आहे. त्यामुळे जिंकण्यासाठीच आपण मैदानात उतरू." अशी माहिती किशोरी पेडणेकर यांनी दिली.
 
 
पुढे त्या म्हणाल्या, "निवडणुकीच्या कामांची तयारी करताना एकमेकांशी समन्वय साधा. एक दिलाने काम करा. काही अडचणी आल्यातर वरिष्ठ नेत्यांशी संपर्क साधा. गाफील राहू नका, असा सल्लाही उद्धव ठाकरे यांनी दिला आहे. तसेच वॉर्ड पुनर्ररचनेचं टेन्शन घेऊ नका. ज्याची सत्ता आहे, ते वॉर्ड पुनर्रचना करणारच. पण तुम्ही कामाला लागा. असं उद्धव ठाकरे यांनी सांगितल्याचं किशोरी पेडणेकर म्हणाल्या.
 
 
 
अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121