मुंबई : राहुल गांधींच्या भारत जोडो यात्रेत सहभाही होण्यासाठी चक्क पैसे वाटले जात असल्याचा आरोप एका सहभागी कार्यकर्त्यानं केला आहे. यातील तरुणाच्या म्हणण्यानुसार, भारत जोडो यात्रेत सहभाही होण्यासाठी तसेच विविध कामांसाठी पैसे दिले आहेत, असं या तरुणाचं म्हणणं आहे. तरुणाने स्वतः याबद्दल खुलासा केलेला आहे. महाराष्ट्रात राहुल गांधींच्या यात्रेला उदंड प्रतिसाद मिळत असल्याचे चित्र सध्या सोशल मीडियावर दाखविले जात असताना प्रत्यक्षात मात्र, अशी पोलखोल सहभागी तरुणानेच केल्याने याबद्दल वादंग निर्माण होण्याची शक्यता आहे. या व्हीडिओबद्दल अद्याप कुठल्याही प्रकारची प्रतिक्रीया काँग्रेस प्रवक्त्यांकडून आलेली नाही.
काँग्रेसचे खासदार राहुल गांधी यांनी पक्षाचे नेते आणि कार्यकर्त्यांसह भारत जोडो यात्रा सुरु आहे. आज 16 नोव्हेंबरला भारत जोडो यात्रेचा 70 वा दिवस आहे.महाराष्ट्रात राहुल गांधींच्या भारत जोडोला उत्स्फुर्त प्रतिसाद मिळतोय. अनेक युवक युवती आणि राजकीय नेते या यात्रेत सहभागी होताना दिसतायत. अनेक नागरिक व सामाजिक संघटना पुरोगामी विचाराचे लोकांकडून राहुल गांधी यांच्या यात्रेत प्रत्यक्ष सहभागी होता येत नसले तरी त्यांना समर्थन देण्यासाठी एकत्रित येऊन त्यांना पाठिंबा दिला जाताना चे चित्र सध्या पाहायला मिळत आहे.
दरम्यान, भारत जोडो यात्रा नांदेड मध्ये असताना, बाईक रॅलीतील लोकांचा प्रचंड जमाव होता. यावेळी माध्यमांनी एका इसमाला बोलावून विचारले असता, या तरुणाने यात्रेत सहभागी होण्याचे रेटकार्डचं जाहीर केले. बाईक रॅलीत सहभागी होण्यासाठी ३००रु शिवाय बाईक रॅलीत सहभागी होण्यासाठी पेट्रोल मिळत असल्याचे ही सांगण्यात आले.