
उरण : स्वामी समर्थांनी स्वतः 12 वर्ष वापरलेल्या चर्म चरणपादुका अक्कल कोट वरून वहाळ येथील साई मंदिरात भक्ताच्या दर्शनासाठी आणण्यात आल्या होत्या. यावेळी हजारो भक्तानी चरण पादुकांचे दर्शन घेतले.
श्री साई देवस्थान चे संस्थापक अध्यक्ष श्री रवीशेठ पाटील यांनी स्वामी पादुकाचे देवस्थानच्या वतीने भव्य स्वागत केले. पादुका घेऊन अभिषेक निकम सर, धनश्री माम्हुलकर आणि सोबत अभिनेता मयुरेश कोटकर आले होते. सोबत आगामी स्वामी आजोबा सिनेमाची टीम आली होती या सिनेमात स्वामी आजोबांची मध्यवर्ती भुमिका मयुरेश कोटकर यांनी साकारली आहे.
श्री स्वामी समर्थ चरण पादुकांचे मंदिरात. श्री रवीशेठ पाटील व जगन शेठ पाटील, पार्वती ताई पाटील यांच्या हस्ते पूजन करण्यात आले. त्यानंतर सर्व भाविकांना दर्शनासाठी खुल्या करण्यात आल्या यावेळी हजारो भाविकांनी स्वामींच्या चरण पादुकांच्या दर्शनाचा लाभ घेतला.
यावेळी अभिनेते मयुरेश कोटकर, अभिषेक निकम धनश्री माहुलकर,माजी सभापती नरेश घरत, श्री जगनशेठ पाटील, नवनिर्वाचित शेकाप तालुका चिटणीस श्री विकास नाईक यांचा यावेळी देवस्थानच्या वतीने सत्कार करण्यात आला होता.
यावेळी देवस्थानचे अध्यक्ष श्री रवीशेठ पाटील. श्री जगनशेठ पाटील. सौ. पार्वती ताई पाटील. माजी सभापती नरेश घरत. शेकाप नवनिर्वाचित तालुका चिटणीस विकास नाईक. रमाकांत पाटील. शिरीष कडू. श्री मो. का. मढवी राजू मुंबईकर. श्रीकांत मुंबईकर. गायक नाना गडकरी. जगदीश पारिंगे. विश्वास पाटील, एकनाथ ठाकूर, खरे गुरुजी आदी सह स्वामी समर्थक भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते.