तुमचा फोन 5G आहे का? जाणून घ्या सोप्या पद्धतीने...
01-Oct-2022
Total Views | 111
27
मुंबई: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते १ ऑक्टो. रोजी दिल्ली येथें 5G सेवेचे लॉंंचिंग करण्यात आले. आता हे 5G तुमच्या-आमच्या फोनमध्ये आहे की नाही? हा प्रश्न सर्वानाच असेल. कारण बहुतेक लोकांचे स्मार्टफोन 5G स्पेक्ट्रम लिलावापूर्वीचे आहेत. त्यामुळे आता लिलावानंतर अनेकांना जाणून घ्यायचे आहे की, त्यांच्या फोनमध्ये 5G चालेल की नाही.
आपला मोबाईल 5G आहे की नाही हे अगदी सोप्या पद्धतीने जाणून घेऊ शकता. यासाठी काही पद्धती माहीत करून घ्या.
तुमच्या फोनच्या सेटिंग्स मध्ये जा. त्यानंतर अनेक पर्याय तुम्हाला दिसतील.
Connection किंवा Wifi Network पर्यायावर क्लिक करावे.
यामध्ये तुम्हाला सिम नेटवर्क किंवा मोबाइल नेटवर्क चा पर्याय मिळेल. त्यावर क्लिक करा.
येथे आल्यावर तुम्हाला नेटवर्क मोडचा पर्याय मिळेल. इथे जर तुम्हाला 5G चा पर्याय दिसत असेल तर तुमचा फोन 5Gला सपोर्ट करू शकेल.
याशिवाय, तुम्हाला स्मार्टफोनच्या वेबसाईटवर जाऊनही पाहता येईल. त्यासाठी तुम्हाला फोनचे मॉडेल शोधावे लागेल. स्पेसिफिकेशन्स च्या यादीमध्ये तुम्हाला 5G बद्दल माहिती मिळेल. जर तुमचा फोन 5G ला ही सपोर्ट करत असेल तर LTE only, 2G only, 3G only, 3G/2G only सोबतच 5G चा ही पर्याय दिसेल.