चित्रा वाघ यांचा राष्ट्रवादीवर पलटवार
मुंबई : राष्ट्रवादी युवक प्रदेशाध्यक्ष मेहबूब खानला भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी सडेतोड उत्तर दिलं आहे. "वाघावर…..कोल्हे कुत्रे भुंकताहेत कारण, मी पिडीतांच्या पाठीशी उभी रहाते म्हणून, सत्तेच्या जोरावर गुन्हे दाखल करून झाले आता माझ्या परीवाराची बदनामी सुरू आहे. मी काय आहे. काय नाही हे तुमच्या बापाला जाऊन विचारा आणि मग या वाघ आहे मी लक्षात ठेवा...कोल्ह्या कुत्र्यांना घाबरणारी नाही, अशी सडेतोड टीका त्यांनी केली आहे.
महेबूब शेख यांनी भाषणाद्वारे चित्रा वाघ यांच्यावर टीका केली होती. आता वाघ यांनी चोख प्रत्युत्तर दिले आहे. "मी वाघ आहे, वाघ माझ्यावर कोल्हे कुत्रे भूंकत आहेत. पण मी कोल्ह्या कुत्र्यांना घाबरणारी नव्हे, अशा शब्दांत त्यांनी पलटवार केला आहे.
महेबूब शेख काय म्हणाले?
"आडनाव वाघ असल्याने कुणी वाघ होत नाही, आपल्या नवऱ्यावर ५ जुन २०१६ रोजी कारवाई झाली तेव्हा सरकार कुणाचं होतं ते सांगा? त्यांनी कोणत्या बुध्दीने कारवाई केली होती याचं उत्तर द्या. आणि तुम्ही काय आहात हे आम्ही पाहिलं, अशी टीका महेबूब शेख यांनी केली होती.