सजग विद्यार्थी आणि सहहृदयी आरोग्यरक्षक

सजग विद्यार्थी आणि सहहृदयी आरोग्यरक्षक

    02-Sep-2021   
Total Views | 205
tan_1  H x W: 0 
 
 
पदविकेचे विद्यार्थी असणारे तन्मय गांगुर्डे यांनी अतिशय कमी वयात सामाजिक भान बाळगत सामाजिक कार्याची धुरा सांभाळली. त्यांच्या कार्याविषयी...
 
 
‘जगातील सर्वात समृद्ध लोकशाही’ अशी भारताची ओळख असण्याबरोबरच ‘तरुणांचा देश’ अशीदेखील भारताची ओळख. कोणत्याही देशाचे भविष्य हे तेथील तरुण आणि विद्यार्थी हे त्या देशाबाबत नेमका काय विचार करतात, यावरच अवलंबून असते. जेव्हा समाजात सहहृद्यतेने सामाजिक विचार करणारे सजग विद्यार्थी सामाजिक सेवेचे व्रत हाती घेतात, तेव्हा त्या समाजात होणारे बदल हे नक्कीच सकारात्मक असतात.कोरोना काळात समाजाला आस होती ती मदतीची. या मदतकार्यात खारीचा उचललेला वाटा हादेखील सिंहाच्या वाट्याची भूमिका बजाविणारा ठरणारा होता. नाशिक शहरातील सिडको हा परिसर म्हणजे नाशिक बाहेरील अनेक नागरिकांचे हक्काचे वसतिस्थान. या परिसराला लागून असलेल्या अंबड औद्योगिक वसाहतीमुळे येथे अन्य राज्यातील नागरिकांचे वास्तव्य जास्त. तसेच, दाट लोकवस्तीचा हा परिसर असल्याने येथे कोरोनासारखा आजार वेगाने फैलावण्याचा धोकादेखील जास्त होता.
 
 
अशावेळी तन्मय गांगुर्डे यांनी या परिसरात कोरोना फैलावू नये, यासाठी कार्य करत शहरातील एका महत्त्वाच्या परिसरात केलेले सामाजिक कार्य हे नक्कीच मोलाचे ठरणारे आहे.पदविकेचे विद्यार्थी असणारे गांगुर्डे यांनी अतिशय कमी वयात सामाजिक भान बाळगत सामाजिक कार्याची धुरा सांभाळली. त्यांचे हे कार्य आगामी काळात नक्कीच प्रेरणादायी ठरणारे आहे.
कोरोनाच्या पाहिल्या लाटेत कोरोनाबाबत जागृती करण्याचे काम गांगुर्डे यांनी अतिशय आत्मीयतेने केले. या काळात नागरिकांची रोगप्रतिकारशक्ती वाढावी, यासाठी ‘आर्सेनिक अल्बम’च्या २,१०० गोळ्यांचे वाटप गांगुर्डे यांनी प्रभाग क्र. २८ मधील मुरारी नगर, कार्तिकेय नगर, डीजीपी नगर, साळुंखे नगर आदी भागात केले. केवळ दहा ते २० दिवसांत या गोळ्यांचे वाटप करत गांगुर्डे यांनी अनेकांना या काळात एकप्रकारे आरोग्यकवच बहाल करण्यात मोलाची भूमिका बजावली.
 
 
तसेच, अनेकांच्या आरोग्यासाठी जीवाजी बाजी लावणार्‍या आरोग्य कर्मचारी, सुरक्षा कर्मचारी, जिल्हा रुग्णालयातील कर्मचारी यांचेदेखील आरोग्य अबाधित राहावे, यासाठी गांगुर्डे यांनी १०० ते २०० गोळ्यांचे वाटप जिल्हा रुग्णालयातदेखील केले.
नागरिकांचे आरोग्यरक्षण होण्याबरोबरच त्यांची या काळात क्षुधातृप्ती होणेदेखी तितकेच महत्त्वाचे होते. हाताला काम नसल्याने अनेकांचा रोजगार बुडाला होता. त्यामुळे हाती पैसे नसल्याने अनेकांना अन्नधान्याची निकड भासत होती. अशावेळी गांगुर्डे यांनी गहू, तांदूळ, बाजरी, आदी धान्यांचे सुमारे १५०० किलो वाटप करत अनेकांची भूक भागविण्याचा प्रयत्न या काळात केला.
सेवावस्ती भागात, कामटवाडे गाव, पंचवटी भागात रस्त्यावर वास्तव्य असणारे नागरिक यांना वस्त्रदान करत मायेची ऊब देण्याचे कार्य गांगुर्डे यांनी या काळात केले. सुमारे २२५ कपड्यांचे वाटप करत गांगुर्डे यांनी अनेकांना यासाठी एक आदर्श वस्तुपाठ निर्माण केला, असे म्हटले तर वावगे ठरणार नाही.
 
 
यासाठी गांगुर्डे यांनी समाजातील विविध स्तरांतील नागरिकांना आवाहन करत त्यांच्याकडील वापरात नसलेले कपड्यांचे संकलन केले. त्यामुळे या मदतकार्यात अनेकांचा हातभार लागण्यास सहज मदत झाली. गांगुर्डे यांच्या मदतीमुळे सुमारे तीन ते चार हजार नागरिकांना आपले जीवन सुसह्यपणे व्यतित करणे सहज शक्य झाले.केवळ ‘आर्सेनिक’ गोळ्यांचे वाटप करून नागरिकांच्या आरोग्याचे रक्षण होणार नाही, हे गांगुर्डे यांनी जाणले होते. त्यामुळे प्रभाग क्र. २८चा परिसर पूर्णत: ‘सॅनिटाईज’ करण्यावरदेखील त्यांनी या काळात भर दिला. प्रभागातील नागरिकांना सहजतेने ही सुविधा उपलब्ध व्हावी, यासाठी गांगुर्डे यांनी ‘फोन करा व सॅनिटायझेशन करा’ ही मोहीम आपल्या प्रभागात या काळात कार्यन्वित केली. याचा लाभ अनेक नागरिकांना या काळात झाला. पहिल्या लाटेत मार्च ते डिसेंबर २०२० या कालावधीत गांगुर्डे यांचा मदतीचा ओघ असाच अविरत सुरू होता.
 
 
कोरोनाची दुसरी लाट जेव्हा सुरू झाली, तेव्हा ती अत्यंत भयानक स्वरूप घेऊन आली. अनेकांना या काळात कोरोनाची लागण झाली. अशावेळी रिक्षाचालक व प्रवासी यांच्या आरोग्याचा प्रश्नदेखील ऐरणीवर आला होता. अशावेळी नाशिकमध्ये पहिल्यांदाच ‘रिक्षा शिल्ड’चे वाटप करत प्रवासी व रिक्षाचालक यांच्यात एक पडदा बसविण्याचे कार्य गांगुर्डे यांनी या काळात केले. त्यांच्या या कार्यातून अनेकांना प्रेरणा मिळाल्याचे ते आवर्जून सांगतात.कोरोनाच्या दुसर्‍या लाटेत ‘रॅपिड अ‍ॅन्टिजेन’ टेस्ट राबवत अनेकांना ‘ऑक्सिजन बेड’ उपलब्ध करून देणे, ‘मल्टिव्हिटॅमिन’ गोळ्यांचे वाटप, जलनेती क्रियाबाबत जागृती व तिचे आयोजन, मास्क वाटप, सॅनिटायझरचे वाटप, रक्तदान मोहीम राबविणे, प्लाझ्मादान मोहीम राबविणे, काढा वाटप आदी उपक्रम राबवत गांगुर्डे यांनी हरप्रकारे नागरिकांच्या सेवेचे व्रत या काळात अंगीकारले. तंत्रज्ञानाचा वापर करत नागरिकांचे संघ तयार करत त्यांनी अनेक नागरिकांना आभासी पद्धतीने एकाच छताखाली आणण्याचा प्रयत्न या काळात केला.
 
 
 
दोन ते तीन गर्भवती महिलांना या काळात कोरोनाची लागण झाली. अशावेळी त्यांचे समुपदेशन करत त्यांना आवश्यक ते वैद्यकीय उपचार उपलब्ध करून देण्यास गांगुर्डे यांनी मोलाची भूमिका बजावली. त्या महिला आजही गांगुर्डे यांना धन्यवाद देत आहेत. हा क्षण गांगुर्डे यांच्यासाठी अत्यंत महत्त्वाचा क्षण ठरला.मदतकार्य करत असताना स्वतःचा कोरोनापासून बचाव करणे, हे एक मोठे आव्हान गांगुर्डे यांच्या समोर होते. यासाठी त्यांनी संरक्षण साधनाचा वापर करणे, सॅनिटायझरचा वापर करणे, ‘फेसशिल्ड’ मास्क वापरणे आदी उपाययोजना करत स्वतःच्या आरोग्याचे रक्षण केले.भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी व आई वैशाली गांगुर्डे यांच्याकडून आपल्याला सामाजिक सेवेची प्रेरणा मिळाल्याचे ते आवर्जून नमूद करतात.
 
 
 या मदतकार्याकरिता गांगुर्डे यांना रा. स्व. संघ जनकल्याण समिती, मित्र जितेंद्र पाटील, प्रतीक बैरागी, गोपाल शिरोडे, पूजा निकम यांचे मोलाचे सहकार्य लाभले.कोरोनामुळे नागरिक भयभीत झाले होते. माणुसकीच्या नात्यातून त्यांना मदत केली. आपल्या मदतीने कुणाचे भले होत असेल, प्राण वाचत असतील, तर त्यातच आपण समाधान मानणे आवश्यक आहे, असे गांगुर्डे म्हणतात.मदत ही केवळ मदत असते, ज्याला मदत करण्याची इच्छा आहे, त्याला कोणत्याही पदाची आवश्यकता नसते. हेच विद्यार्थी असूनही आपल्या अमोल मदतीने गांगुर्डे यांनी सिद्ध केले आहे. त्यामुळे त्यांचे हे कार्य अनेकांसाठी पथदर्शक असेच आहे, असे म्हटले तर वावगे ठरणार नाही.
 
तन्मय आबाजी गांगुर्डे यांच्याविषयी
- राजकीय पक्ष : भारतीय जनता पक्ष
- पद : माजी चिटणीस, भाजप युवा मोर्चा, सिडको मंडल
- कार्यक्षेत्र : नाशिक
- संपर्क क्र. : ८३७८०११०६५
 
 
 
 
 
 
 
 
 

प्रवर देशपांडे

दै. मुंबई तरुण भारतमध्ये उपसंपादक म्हणून कार्यरत. एम. ए  (राज्यशास्त्र आणि आंतरराष्ट्रीय संबंध), एलएल. बी. पर्यंत शिक्षण, राष्ट्रीय नेमबाज, नाशिक येथे विविध महाविद्यालयात Resource Person आणि अधिव्याख्याता म्हणून कार्यरत. JNU-दिल्ली येथील इंडिया फ्युचर ग्रुपशी संलग्न, याचबरोबर नाशिक येथे विविध दैनिकात पत्रकारितेचा सात वर्षांचा अनुभव.

अग्रलेख
जरुर वाचा
सांस्कृतिक राष्ट्रकुलाचा विचार व्हायाला हवा : डॉ. विनय सहस्त्रबुद्धे

सांस्कृतिक राष्ट्रकुलाचा विचार व्हायाला हवा : डॉ. विनय सहस्त्रबुद्धे

“सध्याच्या काळातील संघर्ष बघता, सगळ्या घटनांकडे एका सांस्कृतिक दृष्टिकोनातून बघणे गरजेचे आहे. यासाठी सांस्कृतित राष्ट्रकुलाचा विचार व्हायाला हवा “ असे प्रतिपादन राज्यसभेचे माजी खासदार डॉ. विनय सहस्त्रबुद्धे यांनी केले. दि. ४ ऑक्टोबर रोजी वैभव केळकर आणि डॉ. मेघना दलाल यांनी लिहिलेल्या आणि दिलीपराज प्रकाशन नें प्रकाशित केलेल्या "पार्थसूत्र" या मराठी आणि "Bow & Beyond" या इंग्लिश पुस्तकाचे प्रकाशन पुण्याच्या महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्थेच्या भानुबाई नानावटी कॉलेज ऑफ आर्किटेक्चर येथे पार पडले. या कार्यक्र..

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121