महाराष्ट्राच्या अब्रूचे धिंडवडे

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    12-Sep-2021   
Total Views |

maharashtra_1  
 
साकीनाका बलात्कार कांडातील ती निष्पाप, दुर्दैवी पीडिता. तिच्यावर झालेला बलात्कार, मारहाण आणि नंतर तिच्या गुप्तांगात रॉड खुपसणे... सगळे अगदी अमानवीय, सगळेच भयंकर. त्यावेळी तिला काय भोगावे लागले असेल? त्यावेळी तिला किती शब्दांतीत वेदना झाल्या असतील? सर्व सर्व मनात दाटून येत आहे. पुण्यातलीही अशीच एक १४ वर्षांची बालिका. वसई, अमरावतीमध्येही झालेल्या त्या बलात्काराच्या घटना. महाराष्ट्रात सध्या काय चालू आहे? साकीनाका, पिंपरी-चिंचवड, अमरावती आणि वसई. निष्पाप लेकीबाळींवर बलात्कार सुरू आहेत. लिंगपिसाट सुसाट आहेत. त्यांना कसलीही भीती नाही. बलात्कार म्हणजे नित्याची बातमी झाली आहे. कायद्याचा धाक नाही की त्याने मिळणार्‍या शिक्षेची पर्वा नाही. कारण, ‘यथा राजा तथा प्रजा.’ कोण कुणाला शिक्षा देणार? दिशा सालियानच्या मृत्यूचे गूढ कायम आहे. पूजा चव्हाणच्या मरण्याने कुणाला काय फरक पडला? तिच्या मृत्यूसाठी कोण जबाबदार होते? संजय राठोड पुन्हा मंत्रिपद मिळवण्यासाठी गुडघ्याला बाशिंग बांधून तयार. दुसरीकडे करुणा शर्मा आणि मंत्रिमहोदय धनंजय मुंडे प्रकरण आताही संशयकल्लोळात. मरणार्‍या मेल्या, ज्या मेल्या नाहीत, त्यांच्यावर अत्याचार झाला. मात्र, त्यांचे गुन्हेगार अजूनही मोकाट. पुन्हा एक नव्या निष्पाप कळीचे आयुष्य उद्ध्वस्त करण्यासाठी ते तयार आहेत. आताही महाराष्ट्रात बलात्काराचे सत्र थांबता थांबत नाही. पुरोगामी महाराष्ट्र इतका असुरक्षित कोणी केला? महाराष्ट्रात ‘सरकार’ नावाची गोष्ट शिल्लक आहे का? महिला आयोगाला अध्यक्ष असणे-नसणे ही तर लांबचीच गोष्ट. असो, हाथरसमध्ये पीडित मुलीवर झालेला अत्याचार लोकशाहीवर झालेला अत्याचार आहे, असे बोंबलणारे महाराष्ट्रमधील चाणक्य आणि त्यांचे पहिल्या पाचमधील आता कुठे आहेत? हाथरसमध्ये जाऊन रडणारे पडणारे राहुल-प्रियांका कुठे आहेत? बलात्कारातही जात शोधणारे ती ‘डफलीवाली’, ‘टुकडे टुकडे गँग’ कुठे आहे? एका सर्वेक्षणानुसार २०१९ पासून २०२१ पर्यंत महाराष्ट्रातील बलात्काराच्या गुन्ह्यात १४ टक्के वाढ झाली आहे. ‘फेसबुक लाईव्ह’ येऊन सत्ता राबवू पाहणारे, आया-बहिणींच्या अब्रूचे आणि महाराष्ट्रचेही धिंडवडे कसे थांबवणार? गणपती बाप्पा मार्ग दाखव...
 
 

त्यांना विचारायचे नसते!

 
 
खरा हिंदू हा कितीही गरीब आणि लाचार असू दे, तो आपल्या देवतेची शक्ती कुठल्याही मानवीनिर्मित कृतीने क्षीण झाली, असे कधीही म्हणणार नाही. मात्र, राहुल गांधी काश्मीरच्या दौर्‍यात मंदिरात गेले. तिथे त्यांना दुर्गा-लक्ष्मी- सरस्वती माता दिसली आणि म्हणे त्यांना माहिती आहे की, ‘जीएसटी’, ‘नोटाबंदी’मुळे लक्ष्मीमातेची शक्ती कमी झाली. त्यांच्या या विधानावर मात्र कोट्यवधी भारतीयांचे म्हणणे आहे की, काँग्रेसने स्वातंत्र्यानंतर देशावर २०१४ पर्यंत राज्य केले. त्यावेळी भारतमातेची शक्ती वाढावी, यासाठी काँग्रेसने काय केले? उलट राज्य घटनेत ‘निधर्मी’ आणि ‘समाजवादी’ सारखे शब्द टाकून काँग्रेसने या राष्ट्राची शक्ती वाढवली का? नाहीच!
 
पुढे राहुल असेही म्हणतात की, “मी काश्मिरी पंडित आहे.” मात्र, ते जेव्हा स्वत:ला ‘काश्मिरी पंडित’ म्हणतात, तेव्हा सगळ्यांनाच प्रश्न पडतो की, त्यांचे आजोबा फिरोज गांधी हे काश्मिरी नव्हते. मग राहुल काश्मिरी कसे? 80-90च्या दशकात काश्मिरी पंडितांवर अनन्वित अत्याचार केले गेले. त्यावेळी स्वत:ला ‘काश्मिरी पंडित’ म्हणणार्‍या राहुल गांधी यांच्या काँग्रेसचेच राज्य होते. काश्मिरी पंडितांचे शिरकाण होत असताना काश्मिरी पंडित असलेले सत्ताधारी कुठे होते? पण, काँग्रेसच्या गांधी घराण्याबाबत असे प्रश्न विचारायचे नसतात. राहुल म्हणे कश्मीरच्या दौर्‍यावर होते आणि तिथे ते मंदिरातही गेले. “लोक मंदिरात मुलींना छेडायला जातात,” हे विधान राहुल गांधींचेच. अर्थात, आपण काय बोलतो आणि त्यानुसार वागतोच का, असा धरबंध राहुल गांधी यांना नाही. तो तसा का नाही, असेही विचारायचे नसते. राहुल आणि त्यांच्या ताईला जेव्हा वाटेल तेव्हा ते स्वत:ला ब्राह्मणही म्हणून घेऊ शकतात, जेव्हा वाटेल तेव्हा मुस्लीम अभिमानी म्हणू शकतात, वेळ पडली तर ख्रिस्ती म्हणूनही मिरवू शकतात. इतके सगळे करून ते स्वत:ला निधर्मीही म्हणू शकतात. आता कुणी म्हणेल की, काश्मीरचे ब्राह्मण आहात मग वायनाडच्या मुस्लीम मतांचा हव्यास का, तर असेही अजिबात विचारायचे नसते. कारण, त्यांचे आडनाव ‘गांधी’ आहे. तेच काय? त्यांच्या प्रियांका वाड्रा नावाच्या बहिणीच्या मुलाचे नाव रेहान गांधी कसे, हेसुद्धा विचारायचे नाही. कळले का?
@@AUTHORINFO_V1@@