भावा, तो भाला माझा आहे ; नीरजने सांगितला पाक खेळाडूसोबतचा किस्सा

भावा, तो भाला माझा आहे ; जेव्हा पाक खेळाडूने उचलला होता त्याचा भाला

    25-Aug-2021
Total Views | 171

neeraj_1  H x W
 
नवी दिल्ली : टोकियो ऑलिम्पिक २०२०मध्ये भालाफेक प्रकारात सुवर्ण पदक पटकावत नीरज चोप्राने इतिहास रचला. यावेळी त्याच्यासोबत पाकिस्तानी भालाफेकपटू अर्शद नदीम हादेखील होता. नीरज चोप्राच्या अंतिम फेरीतील पहिल्या थ्रोवेळी त्याची थोडी गडबड झाली. तरीही, त्याने विक्रम रचत सुवर्ण पदकाला गवसणी घातली. यावेळी अर्शद नदीमने पाचवे स्थान पटकावले होते. मात्र त्या गडबडीत जे घडले त्याचा खुलासा नुकताच नीरजने एका मुलाखतीमध्ये केला आहे.
 
 
एका मुलाखतीमध्ये नीरजणे सांगितले की, "मी अंतिम फेरी सुरू होण्यापूर्वी माझा भाला शोधत होतो. मला तो मिळत नव्हता. अचानक मला अर्शद नदीम माझा भाला घेऊन चालताना दिसला. मी त्याला म्हणालो, 'भाऊ हा माझा भाला आहे, मला दे. मला आता तो फेकायचा आहे.' मग त्याने तो मला परत दिला. तेव्हाच तुमच्या लक्षात आले असेल की मी माझा पहिला थ्रो घाईत केला." त्याच्या मुलाखतीमधील हा भाग सध्या सोशल मिडिया खूप वायरल होत आहे. या प्रसंगानंतर आता पाकिस्तानी खेळाडूने छेडछाड केली असेल असेदेखील म्हंटले आहे.
 
 
 
 
पाकिस्तानी भालाफेकपटू अर्शद नदीम आणि नीरज हे चांगले मित्र आहेत. अर्शदने एका मुलाखतीमध्ये सांगितले होते की, भालाफेकमध्ये तो नीरजचा आदर्श ठेवूनच डोळ्यासमोर ठेवून आला आहे. या मुलाखतीमध्ये नीरजने सांगितले की, अर्शदने पात्रता फेरीतही चांगली कामगिरी केली होती. त्याने अंतिम फेरीतही काही फेक चांगले फेकले. मला वाटते की ते पाकिस्तानसाठी चांगले आहे. कारण नदीमच्या कामगिरीनंतर पाकिस्तानच्या तरुणांमध्ये भाला फेकण्याची आवड निर्माण होईल आणि ते भविष्यातील आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये चांगली कामगिरी करतील." असे म्हणत पाकिस्तानी लोकांनी नदीमला प्रोत्साहन आणि पाठिंबा देण्याचं आवाहनही यावेळी नीरजने केले.
 
 
अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121