मुंबई : १९ ऑगस्टपासून केंद्रीय मंत्री नारायण राणे यांची जनआशीर्वाद यात्रेला सुरुवात होणार आहे. राणे हे विमानतळाजवळील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून दादर येथील चैत्यभूमी, सावरकर स्मारक आणि शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीस्थळी जाऊन अभिवादन करणार आहेत. मात्र, 'नारायण राणेंना शिवसेना प्रमुखांच्या स्मृतीस्थळाला राणेंना भेट देऊ देणार नाही,' असे शिवसेनेचे खासदार विनायक राऊत पुन्हा बरळले आहेत. यामुळे पुन्हा आता नारायण राणे आणि शिवसेना पुन्हा आमने-सामने येणार आहेत.
विनायक राऊत यांनी ट्विटरवरुन राणेंवर टीका केली आहे. "नारायण राणेंना बाळासाहेबांच्या स्मृती स्थळाला भेट देण्याचा नैतिक अधिकार नाही." नारायण राणे यांच्या खांद्यावर मुंबई महापालिका, वसई-विरार महापालिकेची जबाबदारी देण्यात आली आहे. शिवाय कोकणाची धुराही राणे यांच्या खांद्यावर असेल. मुंबई महापालिकेच्या दृष्टीने नारायण राणे तब्बल दोन दिवस मुंबईसाठी देणार आहेत. भाजपच्या 'मिशन मुंबई महापालिके'च्या दृष्टीने ही यात्रा महत्त्वपूर्ण ठरणार आहे.