राज्याचं सायबर सेल झोपलं आहे का ? चित्रा वाघ यांचा सवाल
मुंबई: मुलींच्या सोशलमिडीया अकाउंटवर आणि पोस्टवर अश्लील कमेंट करणाऱ्या पवार समर्थकांवरून भाजप उपाध्यक्षा चित्रा वाघ यांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे. दोन्ही ट्रोलरचे नाव तसेच अकाऊंटचे स्क्रीनशॉट्स शेअर करत चित्रा वाघ यांनी राज्याच्या सायबर सेलवरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.
यावेळी फोटो ट्विट करत त्या म्हणतात,"महाराष्ट्र सायबर सेलनं तातडीने यांच्या मुसक्या आवळाव्यात एखाद्या महिलेबद्दल अवमानकारक भाषा वापरणाऱ्या ह्यावर तात्काळ कारवाई अपेक्षित आहे, यापूर्वीही अशाचं पद्धतीत वागलेले कारवाई न झाल्यानेचं या हरामखोरांची हिम्मत वाढली. यांची सर्व माहिती तुम्हाला देते, तुम्हाला यांना उचलायला मदत होईल," असे म्हणत त्यांनी या विकृतांच्या घरचा पत्ताच दिला आहे. पंढरी बोरुडे गाव मजलेशहर ता.शेवगाव जि.अहमदनगर, Mob 9322218764, अभिजीत पळसकर कमिन्स कंपनी पुणे, मोबाईल no+919011032150, ही माहीती देत तत्काळ कारवाई करा," अशी मागणी त्यांनी केली आहे.
मुलींच्या पोस्टवर अश्लील शब्द वापरून कमेंट करणाऱ्या विकृतांवर कारवाई कधी होणार, असा प्रश्न आता सातत्याने विचारला जात आहे. अभिनेत्री असोत वा महिला नेत्या किंवा अन्य कुठल्याही क्षेत्रातील महिलांच्या सोशल मीडिया पोस्टवर वाईट कमेंट्स करणाऱ्यांमध्ये राजकीय समर्थकही आहेत. या सर्वांना ठेचून काढा, अशी मागणी भाजपच्या प्रदेश उपाध्यक्षा चित्रा वाघ यांनी केल्या आहेत. विशेष म्हणजे अशा कमेंट्स करणारा अभिजीत पळसकर हा स्वतःला पवार साहेब समर्थक असल्याचेही आपल्या ट्विटर बायोमध्ये म्हणत आहे.