नवी दिल्ली : जगातील सर्वात मोठी वृत्तपत्रे म्हणून ओळखली जाणारे फायनांशल टाईम्स, न्युयॉर्क टाईम्स, ब्लुमब्लर्ग आणि गार्डीयन्ससारख्या वृत्तपत्रांच्या वेब साईट्स तब्बल ४५ मिनिटे बंद पडल्या होत्या. ब्रिटेनमध्येही बर्याच न्यूज वेबसाइट्स उघडण्यास अडचणी येत आहेत. अद्याप ही समस्या का उद्भवत आहे? याचे कारण स्पष्ट झालेले नाही. परंतु, जगातील सर्वोच्च मानल्या जाणार्या या वृत्तपत्रांच्या वेब साइट्सच बंद पडल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे.
अॅमेझॉनच्या रिटेल वेबसाइटलाही अशाच प्रकारच्या समस्यांचा सामना करावा लागत आहे. परंतु, अद्यापपर्यंत कंपनीने याबद्दल कोणतेही अधिकृत वक्तव्य केलेले नाही. प्राथमिकरित्या, ही तांत्रिक गोष्ट असल्याचे सांगण्यात येत आहे. मात्र, मिळालेल्या माहितीनुसार कंटेण्ट डिलीवरी नेटवर्कमधील काही त्रुटीमुळे ही समस्या उद्भवत असल्याचे सांगण्यात आले आहे. ब्रिटेनमधील काही सरकारी वेब साइट्स, रेडिट, पिनट्रेस्ट, ट्विचसारख्या वेबसाईट्सनादेखील या समस्येला सामोरे जावे लागत आहे.