
मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे संस्थापक अध्यक्ष शरद पवार दि. २९ मार्चपासुन पित्ताशयच्या आजारामुळे मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात भरती होते. तिथे त्यांच्या पोटाची शस्त्रक्रिया करण्यात आली होती. आज शनिवार दि.३ एप्रिलला पवारांना रूग्णालयातून घरी सोडण्यात आले.
शरद पवारांवर लॅप्रोस्कोपी ही शस्रक्रिया पार पडली. अर्धा तास ही शस्रक्रिया चालली होती. त्यानंतर गॉल ब्लॅडरची आणखी एक शस्रक्रिया केली गेली.त्यांनंतर आता त्याना डिस्चार्ज देण्यात आला. डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार पवारांना आणखी पाच ते सात दिवस आराम करण्याचा सुचना देण्यात आल्या आहेत. दि. २९ मार्चला शरद पवार यांना ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल केल्यानंतर केलेल्या आरोग्य तपासणीत पवार यांना मूत्राशयाचा आजार जडल्याचे निष्पन्न झाले होते.