मुंबई : भारताच्या मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरने काही दिवसांपूर्वी कोरोनाची लागण झाल्याची माहिती दिली होती. २७ मार्चला सचिनला कोरोनाची लागण झाली असून, तो घरीच उपचार घेत होता. आता सावधगिरी म्हणून त्याला रुग्णालयात दाखल केले आहे. स्वत: सचिननेच ट्विटरवरून याची माहिती दिली.
आज भारताच्या विश्वविजयाला दहा वर्षे पूर्ण होत आहेत. त्यानिमित्त सचिनने संघातील आपल्या सहकाऱ्यांना आणि भारतीयांना शुभेच्छाही दिल्या. सचिनला कोरोनाची लागण झाल्यानंतर त्याच्या कुटुंबातील इतर सदस्यांची कोरोना चाचणी 'निगेटिव्ह' आली होती. सचिनने काही दिवसांपूर्वी जागतिक रस्ता सुरक्षा मालिकेमध्ये सहभाग घेतला होता. त्याच्यासोबत भारतीय संघात खेळलेल्या इरफाण पठाण, युसुफ पठाण आणि एस. बद्रीनाथ यांनादेखील कोरोनाची लागण झाली आहे.