रोहित की राहुल? कोण असेल पुढचा कर्णधार?

राहुल द्रविडची मुख्य प्रशिक्षक म्हणून निवड झाल्यानंतर चर्चांना उधान

    04-Nov-2021
Total Views | 62

Rohit_1  H x W:
मुंबई : भारतीय संघाची आयसीसी टी २० विश्वचषक स्पर्धेतील कामगिरी ही नावाला साजेशी झालेली नाही. अशामध्ये स्पर्धेपूर्वीच सध्याचा कर्णधार विराट कोहली हा टी २०मधील आपले कर्णधारपद सोडणार असल्याचे घोषित केले आहे. तरीही, जर भारतीय संघ हा उपांत्य फेरी गाठू शकला नाही, तर विराटला एकदिवसीय संघाचेही नेतृत्व करण्याची संधी मिळणार नाही असे चित्र सध्या समोर येत आहे. त्यामुळे आता पुढचा कर्णधार कोण होणार? रोहित शर्मा की के. एल. राहुल? नवे प्रशिक्षक राहुल द्रविडची पसंती कोणाला असणार? अशा अनेक गोष्टीवर सध्या क्रिकेट वर्तुळात चर्चा रंगली आहे.
 
 
 
एका मुलाखती दरम्यान राहुल द्रविडला 'पुढचा कर्णधार कोण?' असे विचारले असता त्याने रोहित शर्माचे नाव घेतले. त्यानंतर त्याने के.एल.राहुलचेही नाव घेतले. यावरून आता पुढच्या कर्णधारपदासाठी अनेक तर्कवितर्क लावले जात आहे. ३ प्रकारच्या फॉरमॅटमध्ये ३ वेगवेगळे कर्णधार असतील, अशीदेखील चर्चा रंगली आहे. अनेक क्रिकेट संघ हा फॉरमॅट वापरत आहेत.
 
 
 
रोहितच्या नेतृत्वात मुंबई इंडियन्स संघाने पाचवेळा आयपीएलचे विजेतेपद जिंकले आहे. तसेच त्याने १० एकदिवसीय आणि १९ टी २० सामन्यांत भारताचे नेतृत्त्व केले आहे. यावेळी त्याने एकदिवसीयमध्ये ८ तर टी २०मध्ये १५ सामने कर्णधार म्हणून जिंकून दिले आहेत. त्यामुळे त्याला या पदाचा मजबूत दावेदार मानले जाते. तर, के. एल. राहुलने पंजाबचे कर्णधारपद सांभाळताना अनेक विजय मिळवून दिले आहेत. तसेच, रिषभ पंत आणि श्रेयस अय्यर यांचेदेखील या शर्यतीत नावे येतात. मात्र, रोहितचे नाव सर्वाधिक पुढे आहे.
 
 
 
अग्रलेख
जरुर वाचा
धार्मिक भावना दुखावण्याच्या शक्यतेने ‘जानकी विरुद्ध केरळ’ चित्रपटाचे नाव बदलणार!

धार्मिक भावना दुखावण्याच्या शक्यतेने ‘जानकी विरुद्ध केरळ’ चित्रपटाचे नाव बदलणार!

भाजप नेते आणि केंद्रीय मंत्री सुरेश गोपी यांची मुख्य भूमिका असलेल्या मल्याळम चित्रपट ‘JSK: जानकी विरुद्ध केरळ’ या चित्रपटाच्या प्रदर्शनावर वादाचे सावट आले होते. केरळ उच्च न्यायालयासमोर सेंट्रल बोर्ड ऑफ फिल्म सर्टिफिकेशन किंवा सेन्सार बोर्ड (CBFC) ने चित्रपटातील काही दृश्यांवर आक्षेप घेतला होता. मात्र आता चित्रपटाच्या निर्मात्यांनी सेन्सार बोर्डाच्या मागण्या उच्च न्यायालयासमोर बुधवार, दि. ९ जुलै रोजी मान्य केल्या असून लवकरच चित्रपटगृहांमध्ये हा चित्रपट प्रदर्शित होण्याची शक्यता आहे...

'सिंदूर' नावात राष्ट्राभिमान आणि सैन्याच्या पराक्रमाचे प्रतीक मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे प्रतिपादन

कर्नाक उड्डाणपुलाचे नामकरण 'सिंदूर उड्डाणपूल भारतीय सैन्याच्या शौर्याला वंदन करण्यासाठी आणि अनेकविध मोहिमांमध्ये दाखवलेल्या सामर्थ्याचा गौरव करण्याच्या उद्देशाने कर्नाक उड्डाणपुलाचे नामकरण 'सिंदूर उड्डाणपूल' असे करण्यात आले आहे. 'सिंदूर' नावामागे राष्ट्राभिमान आणि सैन्याच्या पराक्रमाचे प्रतीक दडले आहे, असे गौरवोद्गार राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काढले. सिंदूर (पूर्वीचे कर्नाक) रेल्वेपुलाच्या उदघाटनप्रसंगी ते बोलत होते. नियोजित वेळेत प्रकल्पाचे आव्हानात्मक काम पार पडल्याबद्दलही मुख्यमंत्री ..

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121