अखेर भारतीयांची इच्छा पूर्ण : 'दि वाॅल'ची प्रशिक्षकपदी निवड

"भारतीय संघाचा प्राशिक्षक म्हणून काम करणे, माझ्यासाठी गौरवास्पद"

    04-Nov-2021
Total Views | 51

Rahul Dravid_1  
मुंबई : दिवाळीदिवशी बीसीसीआयने सर्व भारतीय क्रीडाप्रेमींना आनंददायी बातमी दिली. भारतीय क्रिकेट संघाचा मुख्य प्रशिक्षक म्हणून माजी क्रिकेटपटू राहुल द्रविडची घोषणा करण्यात आली. यामुळे भारतीय क्रिकेटप्रेमींची स्वप्नपुरती झाल्याच्या भावना व्यक्त केल्या आहेत. कारण गेली अनेक वर्षे राहुल द्रविडने मुख्य भारतीय संघाचा प्रशिक्षक व्हावे, अशी इच्छा भारतीय क्रिकेट प्रेमींकडून व्यक्त होत होती. विश्वचषकानंतर द्रविड संघाचे प्रशिक्षकपद सांभाळणार आहे. आगामी न्यूझीलंडविरुद्ध मालिकेमध्ये प्रशिक्षक म्हणून रुजू होईल.
 
 
 
यावेळी राहुल द्रविडने आपल्या भावना व्यक्त करताना म्हंटले आहे की, "भारतीय क्रिकेट संघाचा प्रशिक्षक म्हणून काम करणे हे माझ्यासाठी गौरवास्पद आहे. या जबाबदारीची मी आतुरतेने वाट बघत आहे. रवी शास्त्री प्रशिक्षक असताना संघाने उत्कृष्ट कामगिरी केली. मी प्रशिक्षक झाल्यानंतर आम्ही आणखी पुढे जाऊ. यातील बहुतेक खेळाडूंसोबत मी एनसीए, १९ वर्षांखालील किंवा इंडिया-अमध्ये काम केले आहे. प्रत्येक दिवशी प्रगती करण्याची त्यांची इच्छा आहे, हे मला माहिती आहे. पुढच्या दोन वर्षांमध्ये मोठ्या स्पर्धा होणार आहेत. या स्पर्धांमध्ये सर्वोत्तम कामगिरी करण्यासाठी मी खेळाडू आणि सहाय्यक सहकाऱ्यांसोबत काम करायला तयार आहे."
 
 
आगामी २ वर्षांसाठी राहुल द्रविड हा प्रशिक्षक म्हणून भूमिका साकारणार आहे. या काळामध्ये एक टी - २० विश्वचषक आणि एक ५० षटकांची विश्वचषक स्पर्धा खेळणार आहे. १७ नोव्हेंबरपासून सुरु होणाऱ्या भारत आणि न्यूझीलंड विरुद्ध मालिकेमध्ये तो संघासोबत प्रशिक्षक म्हणून असेल. या मालिकेत 3 टी-२० आणि दोन कसोटी सामने खेळले जाणार आहेत. तर अद्याप फलंदाज, गोलंदाज आणि क्षेत्ररक्षण प्रशिक्षक म्हणून कोणाची निवड करण्यात आली? हे स्पष्ट केलेले नाही. यासंधार्भात लवकरच घोषणा करू असे बिसीसीआयकडून सांगण्यात आले.
 
 
अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121