‘रझा अकादमी’चे प्रवक्ते

    17-Nov-2021
Total Views | 496

Raut _1  H x W:


‘रझा अकादमी’ आणि त्यांच्या इस्लामी कट्टरतावाद्यांनी महाराष्ट्र पेटवण्याचा उद्योग केला. त्याच्या अनेक चित्रफिती समोर आल्या, पण त्यावर बोलण्याऐवजी संजय राऊत ‘रझा अकादमी’ आणि धर्मांध मुस्लिमांचे प्रवक्ते झाले.
 
आज बाळासाहेब असते, तर संजय राऊतांच्या थोबाडीत मारली असती,” असे परखड विधान भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील यांनी केले. अर्थात, बाळासाहेबांनी थोबाडीत मारावी, अशी कामगिरी संजय राऊतांनी गेल्या दोन वर्षांत प्रथमच केली, असे नव्हे, पण चंद्रकांतदादांनी त्यावर आज रोखठोक प्रतिक्रिया दिली. त्याला कारणही तसेच. मालेगाव, नांदेड, अमरावतीतील दंगलीसाठी भाजपला जबाबदार धरताना शिवसेना खासदार संजय राऊत यांनी ‘रझा अकादमी’ भाजपची ‘सिस्टर कन्सर्न’ असून राज्यातील सरकार अस्थिर करण्यासाठी विरोधकांकडून दंगलीचा खेळ सुरू असल्याचा आरोप केला. एकगठ्ठा मतांसाठी मुस्लिमांसमोर कुर्निसात करणार्‍या काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसशी पाट लावला की, स्वतःला हिंदुत्ववादी म्हणवणारेही धर्मांधांसमोर झुकून मुजरा करू लागतात, त्याचे हे जीवंत उदाहरण!
 
 
मालेगाव, नांदेड, अमरावतीतील हिंसाचार माजवण्यात ‘रझा अकादमी’सह इस्लामी कट्टरतावाद्यांचा सक्रिय सहभाग होता. त्रिपुरातील मशीद जाळल्याच्या कथित घटनेवरुन ‘रझा अकादमी’नेच ठिकठिकाणी मोर्चाचे आयोजन केले होते. वस्तुतः ११ ऑगस्ट, २०१२ रोजी ‘रझा अकादमी’ने हजारोंच्या संख्येने जमून मुंबईतील आझाद मैदानावर घातलेल्या हैदोसाचा आणि यंदाच्या ईद-ए-मिलादआधी गावागावातून मोर्चा काढण्यासाठी दिलेल्या धमकीचा इतिहास पाहता विद्यमान ठाकरे सरकारने सतर्क राहण्याची आवश्यकता होती. पण, पोलीस यंत्रणा, तपास यंत्रणा, राज्यस्तरीय गुप्तचर यंत्रणेचा कसलाही उपयोग करून न घेता ठाकरे सरकारने ‘रझा अकादमी’ला धुमाकूळ घालण्यासाठी मोकळे रान दिले. त्यानुसार ‘रझा अकादमी’ आणि त्यांच्या इस्लामी कट्टरतावाद्यांनी महाराष्ट्र पेटवण्याचा उद्योग केला. त्याच्या अनेक चित्रफिती समोर आल्या, पण त्यावर बोलण्याऐवजी संजय राऊत ‘रझा अकादमी’ आणि धर्मांध मुस्लिमांचे प्रवक्ते झाले.
 
 
इस्लामी कट्टरतावाद्यांनी अथवा जिहाद्यांनी देशात कुठेही दंगल घडवली, बॉम्बस्फोट केला की, त्यांना वाचवण्यासाठी विशिष्ट हिंदूद्वेष्टी, भारतद्वेष्टी ‘इकोसिस्टीम’ लगेच कामाला लागते. त्यानुसार हिंसाचारासाठी हिंदुत्ववादी नेते, संघटना, पक्षांना जबाबदार धरले जाते आणि धर्मांध मुस्लिमांच्या निरागसतेचे कौतुक केले जाते. मुंबईवरील ‘२६/११’च्या दहशतवादी हल्ल्यानंतर जिहाद्यांच्या बचावासाठी तथाकथित पुरोगामी, धर्मनिरपेक्ष, उदारमतवादी टोळक्याने केलेल्या हिंदूद्वेष्ट्या, भारतद्वेष्ट्या उचापती आपल्या सर्वांसमोर आहेतच. आता संजय राऊतांनी ‘रझा अकादमी’ला पाठीशी घालून भाजप व भाजपच्या लाखो-कोट्यवधी हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांवर हिंसाचाराचा आरोप करून तोच हिंदूद्वेष्टा, भारतद्वेष्टा प्रकार केला आहे.
 
 
खरे म्हणजे, त्यावर चंद्रकांतदादांनी दिलेली प्रतिक्रिया अतिशय संयत म्हटली पाहिजे, इतके संजय राऊतांचे विधान भयानक, हिंदूंना दडपणारे, हिंदूंचे खच्चीकरण करणारे आणि इस्लामी कट्टरतावाद्यांना नंगानाच घालण्यासाठी प्रोत्साहन देणारे आहे. प्रत्यक्षात आज बाळासाहेब असते, तर त्यांनी एक थोबाडीत नाही, तर संजय राऊतांना धक्के मारून शिवसेनेतून हाकलून लावले असते वा कुठल्याशा टोकावरून कडेलोट केला असता. कारण, बाळासाहेबांना हिंदू आणि हिंदुत्वासाठी डरकाळी फोडणे माहीत होते, शिवसैनिकांनाही हिंदू आणि हिंदुत्वासाठी धर्मांध मुस्लिमांना आडवे जाणे माहीत होते. इस्लामी कट्टरतावाद्यांसमोर पाठीचा कणा वाकवणे वा धर्मांध मुस्लिमांसमोर शेपूट घालणे त्यांना माहीत नव्हते, जे आता संजय राऊत करत आहेत.
 
 
 
मात्र, संजय राऊतांवर इस्लामी कट्टरतावाद्यांचे प्रतिनिधित्व करणार्‍या ‘रझा अकादमी’चे प्रवक्तेपद भूषवण्याची वेळ का आली? तर चित्रपट अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान ड्रग्ज प्रकरणात अडकल्यापासून राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते, राज्याचे अल्पसंख्याकमंत्री नवाब मलिक थयथयाट करू लागले. दररोज पत्रकार परिषदा घेऊन ‘नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो’च्या अधिकार्‍यांपासून भाजप नेत्यांवर वेड्या-वाकड्या शब्दांत टीका करण्याचा, शिव्याशाप देण्याचा एककलमी कार्यक्रम त्यांनी सुरू केला. त्यामागे नवाब मलिकांच्या जावयाला ‘एनसीबी’ने ड्रग्जप्रकरणी तुरुंगात टाकल्याचा रागही होताच.
 
पण, नवाब मलिकांच्या आरोपबाजीमुळे त्यांना प्रसारमाध्यमांत चांगलेच स्थान मिळू लागले, दिवसभर ते वृत्तवाहिन्यांची जागा व्यापू लागले, दुसर्‍या दिवशी वृत्तपत्रांचे मथळे होऊ लागले. नवाब मलिकांच्या रुपात राष्ट्रवादी काँग्रेसला आपले संजय राऊत उभे करायचे आहेत, त्याचीच ही रंगीत तालीम होती. पण, त्याचा मानसिक धक्का संजय राऊतांना बसल्याचे दिसते आणि म्हणूनच आपले संजय राऊतपण अजून शाबूत असून चित्रविचित्र बोलण्यात आपणच ‘एक नंबर’ आहोत, हे दाखवून देण्यासाठी त्यांनी ‘रझा अकादमी’ला वाचवत भाजपवरच दंगल, हिंसाचार घडवल्याचा आरोप केल्याचे म्हटल्यास वावगे ठरणार नाही. कदाचित त्यासाठी संजय राऊतांनी प्रतिस्पर्धी नवाब मलिकांकडूनच उधारीवर ‘हर्बल तंबाखू’ही घेतली असेल, जेणेकरून त्यांनाही नशेचे लाभार्थी होता येईल, काहीबाही बरळता येईल.


दरम्यान, त्रिपुरातील कथित घटनेचे पडसाद महाराष्ट्रातच का उमटले, उत्तर प्रदेश वा कर्नाटकात का नाही, असा बालिश प्रश्नही संजय राऊतांनी विचारला. त्याचे उत्तर उत्तर प्रदेश वा कर्नाटकातील सरकारे इस्लामी कट्टरतावादी असो वा अन्य कोणीही, दंगल केली, हिंसाचार माजवला की, तसे करणार्‍यांविरोधात बेधडक कारवाई करतात, तसे करणार्‍यांची मालमत्ता जप्त करून नुकसानभरपाई वसूल करतात. अर्थात, ‘उत्तर प्रदेश-कर्नाटक में दम है, ठाकरे सरकार में पानी कम हैं।’ महाराष्ट्रात ठाकरे सरकार असल्याने ते आपल्यासमोर नांगीच टाकणार, याची खात्री धर्मांध मुस्लिमांना आहे.



म्हणूनच ‘रझा अकादमी’च्या नेतृत्वाखाली त्यांनी धिंगाणा घातला, ठाकरे सरकारने वचक निर्माण केला असता, तर इथेही उत्तर प्रदेश वा कर्नाटकसारखीच शांतता नांदली असती. पण, ते समजण्याएवढी बौद्धिक पात्रता संजय राऊतांकडे नाही, म्हणून त्यांनी भाजपलाच दंगलीसाठी जबाबदार धरले. ३०० वर्षांपूर्वी मुघलांना जळी-स्थळी-काष्ठी-पाषाणी हिंदवी स्वराज्याचे सेनापती संताजी-धनाजी दिसत असत, तर आता संजय राऊतरुपी मुघलाला सर्वजागी भाजपच दिसतो, त्याचाच हा दाखला!




अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121