राज्यात कैवारी ; पालिकेत वैरी

    08-Jan-2021
Total Views | 72


BMC _1  H x W:



मुंबई :
भिन्न विचारसरणी असूनही राज्यात सत्ता मिळावी म्हणून आघाडी करणारे शिवसेना आणि काँग्रेस हे दोन्ही पक्ष मुंबई महापालिकेत सत्ता मिळावी म्हणून आतापासूनच एकमेकांशी वैर पत्करून आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडत आहेत. मात्र, वर्ष असले तरी पालिकेत मात्र आतापासूनच निवडणुकीचे वारे वाहू लागले आहेत.



राज्यात भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी काँग्रेस, राष्ट्रवादी, समाजवादी यांनी शिवसेनेबरोबर आघाडी केली असली, तरी आमदारांना मंत्रिपदाची खुर्ची मिळाली, काहींना इतर अधिकार मिळाले. पण, तळातील कार्यकर्त्यांचे काय? हा प्रश्न आहेच. त्यांच्यासाठी महापालिकेच्या निवडणुका हीच एक आशा असते. पण, आघाडीतर्फे निवडणूक लढवल्यास कार्यकर्त्यांचे समाधान कसे करणार, हाच प्रश्न काँग्रेससमोर आहे. त्यामुळे राष्ट्रवादी पक्ष शिवसेनेबरोबर निवडणूक लढवण्यास तयार असल्याचे दाखवत असला तरी राष्ट्रीय पक्ष म्हणून काँग्रेस मुंबई महापालिकेच्या सर्वच्या सर्व जागा स्वबळावर लढवणार आहे. त्यामुळे मुंबईवर भगवा फडकविण्यासाठी आघाडीतर्फे निवडणूक लढविण्याची इच्छा व्यक्त केलेल्या शिवसेनेच्या गोटात चिंतेचे वातावरण आहे.

मात्र, स्वबळाच्या विचारांपासून परावृत्त करण्यासाठी शिवसेनेने मुंबई महापालिकेतील विरोधी पक्षनेते काँग्रेसचे रवि राजा यांनाच टीकेचे लक्ष्य केले आहे.राज्यात आघाडीचे सरकार स्थापन होताच, मुंबई महापालिकेतही आघाडी असलेल्या आविर्भावात शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी आणि समाजवादी वागत होते. मात्र, हे वागणे वरकरणी होते. कारण दिलेल्या विशेषाधिकाराचा गैरफायदा घेत ‘कोविड’ काळात प्रशासनाने अमर्याद खर्च करत संकटातही भ्रष्टाचाराची संधी साधली, असा भाजपचा आरोप आहे. त्यामुळे प्रशासनाने केलेल्या आणखी ४०० कोटी खर्चाच्या मागणीला भाजपने विरोध केला. त्याला राष्ट्रवादी आणि समाजवादीसह काँग्रेसनेही पाठिंबा दिला. तसेच ‘हॉटेल ताज’ला रस्त्याच्या वापरासाठी करमुक्ती देण्यावरून बोलू न देता स्थायी समिती अध्यक्षांनी मनमानी करत प्रस्ताव मंजूर केल्याने भाजपने सभात्याग केला. त्यावेळीही राष्ट्रवादी आणि समाजवादीसह काँग्रेसनेही सभात्याग केला. त्यामुळे विरोधी पक्षनेत्यांबद्दल शिवसेनेचा आकस वाढल्याचे दिसत आहे. हा आकस आघाडीत बिघाडी निर्माण करण्यास कारणीभूत ठरत आहे.
अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121