पुणे मेट्रो धावण्यासाठी सज्ज ! चाचणी यशस्वी

    05-Jan-2021
Total Views |

Pune metro_1  H


पीसीएमसी ते फुगेवाडी या ६ किमी अंतरात मेट्रोची यशस्वी चाचणी


पुणे :
पुणे मेट्रोच्या कामाने वेग घेतला असून आत्तापर्यंत ४५% काम पूर्ण झाले आहे.पीसीएमसी ते स्वारगेट आणि वनाझ ते रामवाडी या दोन मार्गिकांमध्ये व्हायाडक्ट, स्टेशन आणि भूमिगत मार्गांची कामे प्रगतीपथावर चालू आहेत. वनाज व रेंज हिल्स येथील डेपो उभारण्याचे काम देखील प्रगतीपथावर आहे. पीसीएमसी ते संत तुकारामनगर या १ किमी मार्गावर पहिली चाचणी बरोबर एकवर्षांपूर्वी मेट्रोची पहिली चाचणी घेण्यात आली होती. त्यानंतर दुसऱ्या चाचणीसाठी पीसीएमसी ते फुगेवाडी या साधारणतः ६ किमी मार्गावर मेट्रो ट्रेन धावली.


कोरोना संसर्गामुळे ६ ते ७ महिन्याचा अवधी वाया गेला. तरीदेखील हा महत्वपूर्ण टप्पा मेट्रोने गाठला. दुपारी दीड वाजता चाचणीसाठी मेट्रो पीसीएमसी स्थानकावरून सुटली आणि दु २ वा फुगेवाडी स्थानकावर पोहोचली.विद्युत तारांची तंदुरुस्ती तसेच ६ किमी रेल्वे रूळ (ट्रॅक) त्याची सुरक्षेतेच्या दृष्टीने निरीक्षण अशा अनेक बाबींची पूर्तता करुन आजची चाचणी यशस्वीरीत्या पार पाडली.या चाचणीसाठी मेट्रोचे कार्यकारी संचालक डी. डी. मिश्रा, मुख्य प्रकल्प अभियंता रवी कुमार, संदीप साकले, श्रीराम मांझी, राजा रमण, रवी टाटा या मेट्रोच्या अधिकाऱ्यांनी अथक परिश्रम केले. चेतन फडके या ट्रेन ऑपरेटर ने आजच्या चाचणीवेळी ट्रेन चालविली.


पुणे मेट्रोचे काम पूर्ण वेळेत करण्यासाठी हा एक महत्वाचा टप्पा आहे. या चाचणीसाठी ३ कोच लांबीची मेट्रो ट्रेन वापरण्यात आली. महामेट्रोचे तांत्रिक कुशल कामगार या चाचणीसाठी अनेक दिवसांपासुन झटत होते. पुणे मेट्रोने रिसर्च, डिझाइन स्टँडर्डाजाइजेशन (RDSO), कमिशनवर ऑफ मेट्रो रेल्वे सेफ्टी (CMRS) आणि रेल्वे बोर्ड यांच्याकडे आवश्यक त्या परवानग्या मिळण्यासाठी अर्ज केला असून चाचणीची पुर्तता महामेट्रोने पूर्ण केली आहे. "रविवार दि. ३ जानेवारी रोजी घेण्यात आलेली चाचणी ही पुणे मेट्रोच्या कामातील एक महत्वाचा टप्पा आहे. आजची चाचणी महामेट्रोने केलेल्या अथक प्रयत्नाचे फळ आहे. सर्व पुणेकरांचा पुणे मेट्रोच्या कामात प्रचंड सहयोग यामुळेच महामेट्रो हे काम यशस्वीरीत्या पुर्ण करू शकते", असं महामेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. ब्रिजेश दीक्षित यांनी म्हटले.
अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121