सीरमच्या कोरोना लसीची चाचणी पुन्हा सुरु!

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    16-Sep-2020
Total Views |
Serum_1  H x W:



तिसऱ्या टप्प्यात साईड इफेक्ट दिसून आल्याने थांबवली होती चाचणी!


मुंबई : कोरोना व्हायरसची लस तयार करण्याचे काम अनेक देशांमध्ये सुरू आहे. भारतातही लस तयार करण्याचे काम सीरम इंस्टिट्यूट करत आहे. परंतू, आता पुण्यातील सीरम इंस्टिट्यूटला डीसीजीआयने(ड्रग कंट्रोलर जनरल ऑफ इंडिया) नोटीस बजावली होती. यानंतर व्हॅक्सीनची ट्रायल थांबवण्यात आली होती. आता ही ट्रायल पुन्हा सुरू करण्यास परवानगी मिळाली आहे.


पुण्याच्या सीरम इंस्टीट्यूट ऑफ इंडियाला ऑक्सफोर्ड यूनिव्हर्सिटी आणि एस्ट्राजेनेकाची कोरोना व्हॅक्सीन ट्रायलची परवानगी मिळाली आहे. ड्रग कंट्रोलर जनरल ऑफ इंडियाने मंगळवारी रात्री उशीरा ही मंजूरी दिली. ब्रिटेनमध्ये या व्हॅक्सीनच्या ट्रायलमध्ये सामिल असलेल्या एका व्यक्तीची तब्येत खराब झाल्यानंतर ट्रायल थांबवण्यात आली होती. आता येथे पुन्हा एकदा ट्रायल सुरू झाली आहे. या घटनेनंतर भारतामध्येही ड्रग कंट्रोलरने ११ सप्टेंबरला ट्रायल रोखली होती.


ऑक्सफर्ड आणि लंडनची फार्मा कंपनी एस्ट्राजेनेका लस तयार करण्याचे काम करत आहे. लसीच्या पहिल्या दोन चाचण्या यशस्वीरित्या पार केल्या. पण, तिसऱ्या टप्प्यात रुग्णांना दिलेल्या लसीचे साईड इफेक्ट्स जाणवल्यानंतर ऑक्सफर्डकडून चाचणी थांबवण्यात आली होती. यानंतर, सीरम इंस्टिट्यूटने म्हटले की ब्रिटनने आपल्या चाचण्या थांबवल्या आहेत. पण भारतातील प्रक्रिया सुरूच राहतील. सीरम इंस्टिट्यूटच्या या प्रतिक्रियेनंतर डीसीजीआयने सीरमला नोटीस बजावली होती.


आम्ही परिस्थितीचा आढावा घेत आहोत आणि एस्ट्राजेनेकाचे ट्रायल सुरू करेपर्यंत आम्ही भारतातील ट्रायल थांबवत आहोत. आम्ही ड्रग कंट्रोलर जनरल ऑफ इंडियाच्या नियमांचे पालन करत आहोत, असे सीरम इंस्टिट्यूटने म्हटले होते.पुण्यातील सीरम इंस्टीट्यूटने कोरोनावर लस निर्मितीचे काम सुरू केले आहे. या लस निर्मितीच्या कामात सीरम इन्स्टिट्यूट एस्ट्राजेनेकासोबत मिळून या लसीचे १०० मिलियन डोस तयार करणार आहे. भारतात ही लस 'कोविशील्ड' नावाने सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया ही लस उत्पादक कंपनी लॉन्च करणार आहे.




@@AUTHORINFO_V1@@