गौरवास्पद ! जगभरातील ४५० माध्यम समुहांनी प्रक्षेपित केला भूमिपूजन सोहळा

    06-Aug-2020
Total Views | 101

ayodhya _1  H x




नवी दिल्ली :
काल पाच ऑगस्ट रोजी राममंदिर भूमिपूजन सोहळा मोठ्या थाटामाटात अयोध्येत संपन्न झाला. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते भूमिपूजन करण्यात आले. या सोहळ्याचा जल्लोष भारतासह जगभरात साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण भारतासह जगभरातील माध्यमांवर करण्यात आले. अमेरिका, ब्रिटन, कॅनडा, ऑस्ट्रेलिया, इंडोनेशिया, थायलंड, नेपाळ आणि इतर अनेक देशांमध्ये प्रसारित केला गेला. भारतातील २०० हून अधिक वाहिन्यांवर हा सोहळा थेट प्रसारित झाला.


पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जवळपास ५०० वर्षांपासून सुरु असलेला हा संघर्ष शांततापूर्ण मार्गाने, न्यायिक मार्गाने संपवला. एशियन न्यूज इंटरनेशनल (एएआय) आणि असोसिएटेड प्रेस टेलिव्हिजन न्यूज (एपीटीएन) या वृत्तसंस्थेद्वारे जगभरातील ४५० मीडिया संस्थांना त्याचे प्रसारण करण्याबाबत सिग्नल देण्यात आले. दूरदर्शन वृत्तवाहिनी डीडी न्यूजने आशिया पॅसिफिक विभागातील देशांमध्ये या कार्यक्रमाचे फुटेज स्वतंत्रपणे प्रसारित केले.
अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121