सुशांत सिंह प्रकरणाचा आलीयाने घेतला धसका !

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    06-Aug-2020
Total Views |

Aila Bhutt_1  H
 


टीकाकारांमुळे कमेंट्स सेक्शन केले बंद !

मुंबई : सुशांत सिंह राजपूत प्रकरणामुळे बॉलीवूडमध्ये होत असलेल्या घराणेशाहीचा फटका स्टारकीड्सना बसत आहे. आलिया भट्टलाही या प्रकरणावरून लक्ष्य करण्यात आले होते. सुशांतची मैत्रीण रिया चक्रवर्ती आणि महेश भट्ट यांच्या संबंधावरून आलीयालाही लक्ष्य करण्यात आले होते. दरम्यान, घराणेशाही आणि गटबाजीविरोधात उठलेल्या संतापाचा फटका करन जोहर, आलीया भट्ट, सलमान, शाहरुख यांच्यावरही टीका झाली होती. आलीया भट्टचा नवा चित्रपट सडक-२ हा ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होणार आहे. 
 
 
 
 
याचे पोस्टर आलीयाने ट्विटरद्वारे पोस्ट केले. मात्र, ट्विट करत असताना कमेंट सेक्शन बंद ठेवले होते. यावरूनही आलीयावर आता टीका होत आहे. टीका होणार हे पूर्वीच माहिती असल्याने आलीयाने ही खबरदारी घेतली का, असा प्रश्न तिला विचारण्यात येत आहे. सडक-२ हा चित्रपट 'हॉटस्टार'वर २८ ऑगस्ट रोजी प्रदर्शित केला जाणार आहे. चित्रपटात आलीयासह आदित्य रॉय कपूर, संजय दत्त, मकरंद देशपांडे, पूजा भट्ट आदी कलाकारांनी हा चित्रपट साकारला आहे.
@@AUTHORINFO_V1@@