अयोध्येने सर्व भेदभाव विसरून साऱ्यांना एकत्र आणले : उमा भारती

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    05-Aug-2020
Total Views |

Uma Bharati _1  
 
 
 
 
अयोध्‍या : राम मंदिर आंदोलनातील महत्वाच्या नेत्या उमा भारती राम मंदिर कार्यक्रमाला उपस्थित आहेत. यापूर्वी राम मंदिर भूमिपूजन कार्यक्रमाला उपस्थित राहणार नसल्याचे त्यांनी सांगितले होते. मात्र, ट्विट करून उपस्थित राहणार असल्याची माहिती त्यांनी सकाळी दिली. 


आपल्या ट्विटमध्ये त्या म्हणाल्या, "मी मर्यादा पुरुषोत्तम प्रभू श्रीरामाच्या मर्यातेद बंदिस्त आहे, मला राम जन्मभूमी न्यासाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी उपस्थित राहण्याचे निर्देश दिले आहेत. त्यामुळे मी उपस्थित आहे." अयोध्येत जन्मभूमीवर पोहोचल्यानंतरही त्यांनी प्रतिक्रीया दिली. अयोध्येने सर्वांना एकत्र आणले, आता हा देश जगाला मान उंचावून सांगू शकेल, इथे कुठलाही भेदभाव नाही, अशी भावूक प्रतिक्रीया त्यांनी दिली आहे.
@@AUTHORINFO_V1@@