चीनी सैन्याकडून पँगाँग तलावाजवळ पुन्हा घसखोरीचा प्रयत्न!

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    31-Aug-2020
Total Views |

Indo china_1  H



सीमेवरील तणावामुळे श्रीनगर-लेह वाहतुकीसाठी बंद!


नवी दिल्ली : भारत आणि चीन सैन्यात सीमालगत भागावर पुन्हा एकदा झडप झाली. पूर्व लडाखमधील पँगाँग तलाव क्षेत्राजवळ २९-३० ऑगस्टच्या रात्री दोन्ही देशांचे सैनिक पुन्हा एकदा आमने-सामने आले. चिनी सैन्याच्या जवानांनी येथे पुन्हा एकदा घुसखोरी करण्याचा प्रयत्न केला. मात्र भारतीय जवानांनी त्यांना चोख प्रत्युत्तर देत त्यांचा डाव हाणून पाडला.


प्राप्त माहितीनुसार, २९-३० ऑगस्टच्या रात्री चिनी सैन्याच्या पीएलएच्या जवानांनी मागील बैठकांत केलेला करार मोडला आणि परिस्थिती बदलण्याचा प्रयत्न करीत पूर्व लडाखजवळ घुसखोरी केली. मात्र, भारतीय सैनिकांनी पीएलएचा हा प्रयत्न अयशस्वी केला आणि पांगोंग तलावाच्या दक्षिणेकडील बाजूस चिनी सैन्याला घुसखोरी करण्यापासून थांबवले.


चीनी सैन्याच्या या कृत्यामुळे सीमेवर पुन्हा तणाव निर्माण झाला आहे. चीनच्या या आक्रमक कृतीनंतर खबरदारीचा उपाय म्हणून श्रीनगर-लेह महामार्ग नागरिकांसाठी बंद करण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे.


संरक्षण दल आणि त्यांच्या वाहनांसाठी फक्त हा मार्ग खुला असेल. २९-३० ऑगस्टच्या रात्री चिनी सैन्याने एकतर्फी नियंत्रण रेषा बदलण्याचा प्रयत्न केला. सतर्क असलेल्या भारतीय सैन्याने जोरदार प्रत्युत्तर देत चिनी सैन्याचा हा डाव उधळून लावला. गलवान खोऱ्यातील संघर्षानंतर चीन काही भागातून मागे हटला होता.


गलवान खोऱ्यातील संघर्षानंतर पार पडलेल्या बैठकीतही चीनने आपली बाजू अद्याप स्पष्ट केलेली नाही. पँगाँग टीएसओमध्ये अद्यापही चिनी सैन्य तळ ठोकून आहे. त्यामुळे या भागात संघर्षाचा भडका पुन्हा उडू शकतो, असा इशारा सातत्याने तज्ज्ञांकडून दिला जात होता. आता २९-३० ऑगस्टच्या रात्री ही घटना घडली.



@@AUTHORINFO_V1@@